suvichar

बीड जिल्ह्यात दिव्यांगांच्या सहाय्यासाठी 'दिव्यांगसाठी' विशेष संकेतस्थळ

सोमवार, 4 मे 2020 (08:27 IST)
दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात संकेत स्थळ असावं, असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या 'दिव्यांगसाथी' या विशेष संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल. या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३ टक्के खर्च योजना, विमा, पेंशन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणं सोपं जाणार आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

वर्ध्यात नसरापूरसारखीच क्रूरता: १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडांनी ठेचून हत्या

सुनील तटकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या गुप्त भेट; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली

पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी; गुदमरून एका भाविकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची भीती

भिकाऱ्याच्या घरातून ५४ कोटी रुपयांचे सोने जप्त, गुवाहाटीत अटक, महाराष्ट्राशी थेट संबंध

पुढील लेख
Show comments