1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (10:04 IST)

कोश्यारींना बाहेर काढा, मोदींना माझी हात जोडून विनंती – संभाजीराजे छत्रपती

sambhaji raje
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत.
 
याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
 
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ सुरू होता. त्यावेळी कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं.
 
या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले झाले. मी आत्ताच्या काळात बोलत आहे." ही बातमी मुंबई तकने दिली.


Published By- Priya Dixit