ganesh chaturthi

नववर्ष दिनी आरोग्याचा कुंभमेळा नाशकात साजरा करूया- पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने

Updated: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (10:18 IST)
याप्रसंगी व्यासपीठावर महाआरोग्य शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, भाजपा शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आहेर, भाजपा जालना जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादरगे, पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील, मनपा गटनेते सतिष कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, गोपाळ पाटील शहर शिवाजी गांगुर्डे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुरेश पाटील, संभाजी मोरूस्कर, काशिनाथ शिलेदार, कुणाल वाघ, दिनकर आढाव, संदीप जाधव, अनिल भालेराव आदि उपस्थित होते.

नाशिकचे पालकमंत्री ना. गिरिष महाजन यांच्यामुळे या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधि आपणास मिळाली आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे आणि आपल्या शेजारी असलेले आजारी बघा आणि हजारो रुग्णांना या शिबिराचा लाभ कसा मिळवून देता येईल ह्या दृष्टीने  पाऊले उचला असे आवाहन ही डॉ. लहाने यांनी आपल्या मनोगतात केले. रुग्णांनचे आशिर्वाद नेहमीच कामी येतात. मी रोज ५०० हून अधिक रुग्ण तपासतो, आत्ता पर्यंत मी १.५ लाख शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यामुळेच माझे जीवन आनंदी आहे. नाशिक येथे संपन्न होत असलेल्या शिबिराच्या निमित्ताने मी ६ दिवस येथे राहणार आहे. मी केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर रुग्णांनची तपासणी ही करणार आहे. मुंबईहून ७०ते ८० डॉक्टरांचे पथक येथे येणार आहे, असेही डॉ.लहाने यांनी पुढे नमूद केले.

नाशिक येथे होणार्‍या महाआरोग्य शिबिरात शासकीय यंत्रणा बरोबरच सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. गांवात घरोघरी जाऊन रुग्ण शोधा आणि त्यांना या शिबिराचा लाभ मिळवून द्या. असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी आपल्या भाषणात केले. ना.गिरिष महाजन यांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य भरात झालेल्या महाआरोग्य शिबिराची तसेच फलनिष्पतीची  माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. जागतिक दर्जाचे डॉक्टर्स नाशकात येणार आहेत त्यामध्ये नेत्ररोग दंत रोग, कर्क रोग, स्त्री रोग,मूत्र पिंड विकार,अस्थि रोग, प्लास्टिक सर्जरी, बाल रोग,किडनी रोग, हृदय रोग, छाती व नाक-कान-घसा रोग,त्वचा रोग, मेंदू विकार आदि विभागांचे तज्ञ यावेळी उपचार आणि शस्त्रक्रिया करणार आहेत. असेही नाईक पुढे म्हणाले.यावेळी त्यांनी आरोग्य शिबिर दरम्यानच्या नियोजन समित्यांची जबाबदारी व माहिती दिली.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

बदलापूरमध्ये शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एसटीने दिलासादायक प्रवास पुरवला, एनसीएमसी कार्डची आवश्यकता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

संचेती चौकात दुचाकीस्वाराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला धडक दिली, एफआयआर दाखल

रेडमी नोट 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स वर 5,000ची सूट, 10,000mAh बॅटरी आणि 3,500 निट्सचा डिस्प्ले: स्वस्त स्मार्टफोन्सनी खळबळ उडवली

पुढील लेख
Show comments