Marathi Biodata Maker

तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी बेमुदत संप पुकारला

Updated: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (07:27 IST)
 
नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरून 4800 रुपये वाढवण्याची तहसीलदारांची मागणी आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला. मात्र, वेतन वाढवले नाही. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोनच्या पदावर काम करतात. मात्र, वेतन वर्ग तीनचे घेतात. त्यामुळे नायब तहसीलदारांना वर्ग दोनच्या अधिकार्‍यांएवढे वेतन मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेने केली आहे. वाढीव ग्रे पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2200 पेक्षा अधिक नायब तहसिलदारांना फायदा होईल. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीवर 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. या बेमुदत संपामुळे जिल्हयातील तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान तहसीलदार संघटनेच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आले.
 
ही कामे खोळंबली
– दैनंदिन दाखले
– जमीन महसुलाची कामे
– सातबारा, फेरफार, महसुली प्रकरणे
– रोजगार हमी योजनेची कामे
– तालुक्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणे
– सेतू सुविधा
– तालुका दंडाधिकारी स्वरूपाची कामे
– अधिवास प्रमाणपत्र
– महसुली प्रकरणे
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: मनोज जरांगे यांच्या मुंबईत आंदोलनाच्या घोषणेवर बावनकुळे यांचे वक्तव्य

BRICS Summit: चीन मध्य पूर्वेतील शांतता आणि स्थैर्यासाठी ब्रिक्स देशांसोबत काम करेल, शी जिनपिंग यांचे निवेदन

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार; महिलांना अमृता फडणवीस, लता शिंदे यांच्या घरी भेट देण्याचे आवाहन

शालेय बस झाडाला धडकल्याने अमरावतीतील २५ मुले थोडक्यात बचावली

पुढील लेख
Show comments