ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात
शिवसेनेत फूट पडली आणि माविआ सरकार पडली असून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाले . सध्या ठाकरे गटातून गळती सुरु आहे. अलीकडेच ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता ठाकरे गटातील 3 खासदार आणि 8 आमदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.
मागे देखील प्रतापराव यांनी मुंबईतील खासदार शिंदे गटात येण्याचे सांगितले होते. आणि तसा दावा त्यांनी केला होता. आणि गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. आता प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केल्याने सध्या खळबळ उडाली आहे.
Edited By- Priya Dixit