ganesh chaturthi
✕

शेतातुन घरी जात असताना कारची धडक, तीन शेतमजूर महिलांचा मृत्यू

Updated: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (20:55 IST)
 
 याबाबत अधिक माहिती अशी की , शेतीची कामे आटोपून तीनही महिला रस्त्याने घरी जात असताना सूतगिरणी जवळील असलेल्या मोठ्या वळणावर या तीन महिला उभ्या असताना नांदुरा येथून भरधाव वेगात येत असलेल्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच २८ ए झेड ३९९७ च्या गाडी चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून महिलांच्या अंगावर गाडी नेली.
 
या अपघातात तीनही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिकांना धाव घेऊन त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले. रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यामधील नंदाबाई महादेव दांडगे वय ५० वर्ष व मुलगी वैष्णवी महादेव दांडगे वय १७ वर्षे या मायलेकीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
 
तर बेबाबाई लक्ष्मण घोपे यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर करण्यात आले होते. खामगाव येथे नेत असताना वाटेतच त्‍यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.













Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments