गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:32 IST)

त्र्यंबकेश्वरमध्ये माँ अन्नपूर्णा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

इन्दौरच्या सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचा पुढाकार  

 

इन्दौरमधील सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टच्या  त्र्यंबकेश्वर येथी निलगिरी पर्वतावर  अन्नपूर्णा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा  येत्या २१ फेब्रुवारी रोजी  संपन्न होत आहे. यानिमित्ताने  १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शतकुण्डीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञ संपन्न होत आहे. तर  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनमुखमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजनसार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
 

जोतिर्लिंग मंदिराचा कलश आणि  माँ  अन्नपूर्णाचे दर्शन असा अदभूत योग मिळणा-या नील पर्वतावर हे मंदिर ३ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले असून शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकच ठिकाणी असलेले  त्र्यंबकेश्वर हे देशातील दुसरेच ठिकाण आहे. माँ अन्नपूर्णा सोबतच माँ  सरस्वती व माँ महाकाली यांच्याही मूर्ती तेथे असून मंदिर परिसरातच भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.  अन्नपूर्णा देवीची मूर्ती १९३१ कि. ग्रा. सरस्वती देवीची मूर्ती ७५० कि.ग्रा.व महाकालीची मूर्ती ४७० की. ग्रा. वजनाच्या असून त्या पंचधातूमध्ये साकारल्या आहेत.

मंदिराच्या निर्माणाचा इतिहास सांगतांना प्रमुख संयोजक शाम कुमार सिंघल म्हणाले कीआश्रमाचे संस्थापक ब्रम्हलीन स्वामी प्रभानंद गिरि महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे मंदिर उभारण्याचे स्वप्न पहिले पण ते हयात असेपर्यंत त्यास मूर्त रूप येऊ शकले नाही. त्यांचे शिष्य व सध्याचे महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज  यांनी ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता १९९५ मध्ये अनि आखाड्याच्या सहाय्याने येथे जमीन मिळवली ब नंतर वर्ष २००२ मध्ये मंदिराचे निर्माण कार्य सुरु झाले व २२ वर्षानंतर हे स्वप्न मूर्त स्वरुपात साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता कलश यात्रेने होणार असून त्यानंतर १० दिवस महायज्ञ चालेल. या महायज्ञा करीता शस्त्रशुद्धरित्या ३२००० स्केअर फुट एवढ्या भव्य यज्ञ शाळेचे निर्माण केले असून यामध्ये १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ६५० विद्वान व १०० जोडपी यज्ञास बसतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान इंदौरचे अॅड. सुनील गुप्ता असून समितीचे अध्यक्ष विनोद अग्रवालसचिव प्रदीपभाई पटेलस्वागताध्यक्ष कैलास घुले व दिनेश मित्तल समवेत देशातील विविध भागातील भाविकांनी मंदिर उभारणीत मोलाचे सहकार्य दिले आहे.