Marathi Biodata Maker
✕

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी केली युतीची घोषणा

Updated: सोमवार, 23 जानेवारी 2023 (13:25 IST)
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे."
 
"गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला."
 
"शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो," असंही आंबेडकर म्हणाले.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
 
दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.
 
या युतीबद्दल बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी म्हटलं होतं की, "आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे."
 
"माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू," असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.
 
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे.
 
"उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ."
 
Published By- Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ५७ धावांनी पराभूत केले

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जाहीर

रशियाने दोन रात्रींमध्ये युक्रेनचे २,७७७ ड्रोन पाडल्याचा दावा केला

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

पुढील लेख
Show comments