Festival Posters
✕

शिंदे यांना हटवल्यानंतर शिवसेनेत एक नवीन 'उदय' होईल असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2025 (11:06 IST)
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर असून इकडे पालकमंत्री पदावरून महाराष्ट्रातील राजकीय तापमान वाढले आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा भाग असलेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (यूबीटी) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. वडेट्टीवार आणि राऊत यांचा आरोप आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडल्यानंतर आता भाजप शिंदे यांच्या शिवसेनेला तोडत आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेना (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले नाराज होते आणि मंत्री नाशिकचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने दादा भुसे संतापले आहे. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गही रोखला होता आणि जाळपोळ केली होती.

तसेच सोमवारी काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीतील नाराजीचे नाट्य संपत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रागाच्या भरात त्यांच्या गावी गेले आहे. तर संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच तुटणार होती, असा दावा केला आहे.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments