रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:59 IST)

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश २७ जूनपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता १४ ऑगस्ट पर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत (कृषिविज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून) सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढविण्यात आली आहे.
 
याशिवाय विद्यार्थ्यांना रुपये शंभर विनाविलंब शुल्कासह दि. १ ते १५ सप्टेंबर पर्यंत तर रुपये पाचशे सह दि. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार नाही असे विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यामतूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात ८ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.acअथवा ycmou.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले आहे.