1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (17:35 IST)

Anniversary Wishes For Husband In Marathi पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

anniversary wishes for husband in marathi
आयुष्यात केवळ एकच इच्छा
आपल्या दोघांची साथ कायम राहो
जीवनातील संकटाशी लढताना
साथ कधीही न संपो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं
हे नातं असंच तेवत राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार आपला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्व वर्षांसाठी खूप धन्यवाद
आणि पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी आपण दोघांना खूप खूप शुभेच्छा
 
इतक्या वर्षानंतरही
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात हँडसम व्यक्ती तूच आहेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच असशील
कायम माझ्यासोबत राहा
सुखाच्या पायर्‍या कशा चढतो बघशील
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्नाचा वाढदिवस साजरा करणे हा आनंद क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे हे मी जाणून आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
I Love You हे फक्त तीन शब्द
याचे दररोज वेगळेच महत्त्व आहे
शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हृद्यात
तुझ्यासाठीच भरभरुन प्रेम आहे
हॅपी अॅनिव्हर्सरी
 
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात
पण मला तर बदलेला तू तेवढाच आवडतो
कारण बदल चांगले असले की 
संसार अजूनच बहरतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
फक्त माझा नवरा म्हणून नव्हे तर
जीवनातील प्रत्येक गरजेप्रमाणे माझा मित्र
माझा सल्लागार, माझी सावली बनून राहिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद
हॅपी एनिवर्सरी
 
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थना करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा