suvichar
✕

Life Lessons जवळच्या मित्रांसोबतही या ३ गोष्टी शेअर करू नका

Updated: सोमवार, 23 जून 2025 (15:14 IST)
 
तुमचे नाते - तुमचे नाते ही तुमची वैयक्तिक बाब आहे. मैत्री कितीही खोल असली तरी, तुमच्या जोडीदाराशी संबंधित भांडणे, योजना किंवा जिव्हाळ्याच्या गोष्टी इतरांना सांगणे योग्य नाही. यामुळे तुमच्या वैयक्तिक नात्यावरील विश्वास देखील कमी होतो, यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमधील नाते कधीही कोणाशीही शेअर करू नये. यामुळे इतरांना तुमची कमजोरी दिसून येते.
 
आर्थिक स्थिती - तुमच्या पगाराबद्दल, बचतीबद्दल किंवा कर्जाबद्दल कधीही जवळच्या मित्राला सांगणे योग्य नाही. पैशामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. म्हणून, या गोष्टी खाजगी ठेवणे शहाणपणाचे आहे. लोक तुमच्या पगाराबद्दल खूप उत्सुक असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांना तुमचा पगार सांगितलात, तर गरजेच्या वेळी ते तुमच्याकडून प्रथम पैसे मागतील. जर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकत नसाल तर तुमच्यात मतभेद निर्माण होतील. आणि जर तुमचा पगार कमी असेल तर लोक तुमची चेष्टा करतील.
 
इतरांचे गुपिते- जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला असेल आणि त्याचे गुपिते सांगितले असतील तर ते तुमच्या मित्रांनाही सांगू नका. यामुळे तुमची विश्वासार्हता कमी होतेच, पण नातेसंबंधही बिघडू शकतात. तुमच्या भूतकाळातील चुकांचे परिणाम कधीही कोणालाही दाखवू नका. यामुळे तुमची नकारात्मक बाजू इतरांसमोर येईल. आणि लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतील.
ALSO READ: पंचतंत्र : दोन मित्रांची गोष्ट
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments