Biodata Maker marathi
✕

Relationship Tips: घटस्फोटाच्या काही काळानंतर नात्याला संधी देण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (15:18 IST)
 
पती-पत्नीच्या नात्यात भांडणे, प्रेम, मसकरी ,वादावादी हे सगळेच चालू असते, पण कधी कधी काही प्रसंग मोठे वळण घेतात तर कधी प्रकरण इतके मोठे होते की त्यांचे नाते घटस्फोटात संपते. परंतु काही काळ विभक्त झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकत्र यायचे असेल. या परिस्थितीत तुम्ही तुमच्या नात्याला आणखी एक संधी कशी देऊ शकता या टिप्स अवलंबवा.

घटस्फोटानंतर त्याच नात्याला दुसरी संधी देणं थोडं कठीण आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे नाते पुन्हा घट्ट व्हायचे असेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे तुटलेले नाते पुन्हा मजबूत करू शकता.
 
तुमच्या बाजूने पुढाकार घ्या
घटस्फोटानंतर तुम्हाला तुमच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची असेल तर आधी तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करा. जर तुम्ही पूर्णपणे सहमत आहात आणि या नात्यात नवीन सुरुवात करू इच्छित असाल तर तुमच्या जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा.
 
तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त व्हा
तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करा आणि त्यांना सांगा की तुम्हाला वेगळे झाल्याबद्दल खेद वाटतो. तुमच्या जोडीदाराला सांगा की तुम्हाला हे नाते नव्याने सुरू करायचे आहे. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटल्यानंतरही सांगू शकता.
 
अशा प्रकारे तुम्ही नवीन सुरुवात करू शकता
तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकता आणि तिला तुम्ही दोघांनी एकत्र घालवलेल्या जुन्या काळाची आठवण करून देऊ शकता. तुम्ही तुमच्या चुकीबद्दल त्यांना सॉरी देखील म्हणू शकता. तुमच्या जोडीदाराला जुन्या आठवणींचा त्रास होऊ देऊ नका. या परिस्थितीत, खूप प्रयत्न करू नका आणि थोडा संयम ठेवा.
 
जवळच्या मित्राची किंवा नातेवाईकाची मदत घ्या
एकत्र येण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही सुज्ञ मित्राची किंवा नातेवाईकांची मदत घेऊ शकता. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रोफेशनल कौन्सिलरचीही मदत घेऊ शकता.
 
धीर धरा आणि घाई करू नका
कारण तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे पण घाईने काहीही करू नका. घटस्फोटानंतर पुन्हा नातं घट्ट करणं थोडं कठीण जातं हे खरं आहे. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनर रिलेशनशिपमध्ये परत येण्यास नकार देत असेल तर स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

पुढील लेख
Show comments