Daily Horoscope

True Friendship मित्र तुमच्यापासून गोष्टी लपवत असल्यास फसवणूक ओळखा

Published: मंगळवार, 29 जुलै 2025 (16:10 IST)
 
मित्र अधिक प्रशंसा करत असेल- खरा मित्र किंवा मित्र नेहमीच तुमचं भलं इच्छित असतात. ते तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात. तुमच्या चुकीच्या गोष्टींवर टीका करतात. तुमच्या तोंडावर तुमच्या वाईट सवयी सांगण्यास अजिबात संकोच करत नाही. पण जर तुमचा मित्र तुमची खूप स्तुती करत असेल, खूप गोड वागत असेल आणि तुमचा मन आनंदी करण्यापुरती गोष्टींबद्दल बोलत असेल तर अशा मित्राच्या वागण्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही सवयी असतात, म्हणून जर तुमचा मित्र फक्त चांगल्या गोष्टी सांगत असेल, जर तो फक्त तुमच्या चांगल्या सवयींवर बोलत असेल तर तो तुमच्या वाईट सवयींच्या वाईट सवयी तुमच्या पाठीमागे इतरांसमोर बोलू शकतो. असे लोक मैत्रीत फसवणूक करणारे असतात.
 
 
काळजीच्या भावना- आयुष्यात असे अनेक मित्र असू शकतात जे तुमच्या यशावर आनंदी असल्याचे भासवतात पण तुम्ही कोणतेही मोठे काम केले नाही असे दाखवत असेल. आपलं मनोबल पाडण्याचे किंवा नकारात्मक विचार व्यक्त करत असेल, त्याला तुमच्या भावनांची पर्वा नाही. असे मित्र क्षणार्धात हातवारे बदलत असतात. ते अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावतात. तुमच्या ओळखीत असा मित्र असेल तर त्याला तुमचा खरा मित्र मानण्याची चूक करू नका.
 
चुकीच्या मार्गाने नेणारे- एखाद्या व्यक्तीशी मैत्री झाली तर तुमचे आयुष्य खराब होऊ शकते. चुकीची व्यक्ती तुमचा खरा मित्र कधीच नसतो. जर तुमचा मित्र तुम्हाला अभ्यासापासून थांबवत असेल, आपली ओळख वाईट संगत असणार्‍यांशी करवून देत असेल, आपल्या स्वप्नं आणि ध्येये यात अडथळे निर्माण करत असेल किंवा आपल्या भ्रमित करण्याचा प्रयत्न करत असेल तर असे मित्र आपले चांगले मित्र ठरु शकत नाही.
 
खोटे बोलणारे- मैत्री विश्वासावर टिकून राहते. मित्र प्रत्येक वेळी एकमेकांशी शेअर करतात, परंतु प्रत्येक वैयक्तिक गोष्टी शेअर करणे आवश्यक नाही. मात्र यासाठी मित्राशी खोटे बोलण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना मोकळेपणाने सांगू शकता की तुम्ही आता ही गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करण्यास तयार नाही. मैत्रीत खोटे बोलू नये. पण जर तुमचा मित्र तुमच्याशी खोटे बोलत असेल तर तो तुमचा खरा मित्र होऊ शकत नाही.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments