शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (17:00 IST)

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

लव्ह एट फर्स्ट साइट तर आपण नक्कीच ऐकले असेल ज्यात एका क्षणात एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो मात्र तितक्याच लवकर असे संबंध तुटतात देखील. आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होतात आणि संबंध नेहमीसाठी विस्कटतात. काही वेळा पती-पत्नीमध्ये छोटे-छोटे मुद्देही इतके गंभीर होतात की त्यांना वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
 
काही वेळा लग्नापूर्वी काही समस्यांमुळे पती-पत्नी घटस्फोट घेतात. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला त्या तीन गोष्टींबद्दल विचारणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे भविष्यात घटस्फोटाची शक्यता निर्माण होत नाही. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या तीन गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराला विचारल्या पाहिजेत.
 
वय- आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'नीती शास्त्रा'मध्ये सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराचे वय जाणून घेतले पाहिजे. काही वेळा वयाच्या फरकामुळे जोडप्यांची समजूत जुळत नाही. म्हणूनच असे म्हणतात की पती-पत्नीच्या वयातील फरक जितका कमी असेल तितके त्यांचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी असते.
 
आरोग्य- आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पती-पत्नीने लग्नापूर्वी जोडीदाराच्या आरोग्याची माहिती घ्यावी. त्यांना शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या काही समस्या असल्यास त्याबद्दल त्यांना अगोदर सांगावे.
 
नाते- चाणक्यने आपल्या 'नीती शास्त्र'मध्ये म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या जोडीदारासोबत आपल्या भूतकाळातील संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. जेणेकरून भविष्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुतीवर आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.