Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या जानेवारीत राष्ट्रीय ‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ चे आयोजन

Updated: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:49 IST)
 
या स्पर्धेत दीर्घपल्ल्याची (१५० किमी) नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करतील. १८ ते ४० वर्षातील महिला व पुरुष गट तसेच ४० वर्षावरील गटासाठी १५० किमीची नाशिक - कसारा – घोटी – कावनई – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर स्पर्धा होईल. तर ५० की.मी साठी नाशिक – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर हि स्पर्धा होणार आहे. बक्षिसांची एकूण रक्कम १० लाख रुपये आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांकरिता १५ की.मी आणि हौशी लोकांसाठी (सगळ्या स्पर्धकांसाठी) १५ किमीची ‘जॉय राईड’ देखील आयोजित करण्यात आली आहे. तर घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही दिला जाणार आहे.
 
या स्पर्धेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (nashikcyclists.com) देखील सुरु आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०१७ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी nashikcyclists.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
अशी होईल स्पर्धा :
१५० किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक-कसारा–घोटी–कावनई–त्र्यंबकेश्वर–नाशिक
* (१८ ते ४० वयोगट) आणि * (४० वर्षापुढील गट)
 
५०किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक – त्र्यंबक – नाशिक
* १८ ते ४० वयोगट (पुरुष आणि महिला)
* ४० वर्षांपुढील वयोगट (पुरुष आणि महिला)
  
१५ किलोमीटर सायकल स्पर्धा :
१४ ते १८ वयोगट (मुले आणि मुली) 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

युवा बॅडमिंटनपटू मानसी सिंग अंतिम सामन्यात शू वेन जिंगकडून पराभूत होऊन उपविजेती ठरली

ईशान किशनने दुलीप ट्रॉफीमधील ३९ वर्षांचा विक्रम मोडला, द्विशतक झळकावले

LIVE: परीक्षेतील गोंधळामुळे पुण्यात Gen-Z रस्त्यावर! जंतर-मंतरसारख्या आंदोलनाने पुणे हादरले

"मला रेड-लाइट आणि गुन्हेगारी भागांमध्ये जास्त मते मिळाली" नागपूरमध्ये 'रोडमॅन' नितीन गडकरी असे का म्हणाले?

नवी मुंबईत विमानतळाजवळ मध्यरात्री कॅब चालकाकडून महिला प्रवाशाचा विनयभंग

पुढील लेख
Show comments