शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

योगेश्वरला रौप्य नाही

मुंबई- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियाचा दिवंगत कुस्तीपटू बेसिक खुदाखोव प्रकरणी चौकशी थांबवण्याच्या निर्णय घेतल्याने पैलवान योगेश्वर दत्तचे लंडन ‍ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले कांस्यपदक रौप्यपदकात अपग्रेड होणार नाही. त्यामुळे योगेश्वरला कांस्पदकावरच समाधान मानावे लागणार आहे. लंडन ऑलिम्पिकदरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यात रशियाचा पैलवान खुदोखोज दोषी आढळला होता. त्यामुळे त्याचे रौप्यपदक योगेश्वर दत्तला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. 
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मात्र या प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.