1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

हरभजनवरील वर्णद्वेषाचा आरोप मागे

फक्त मॅच फीचा दंड

एडलेडच्या फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश जॉन हेन्सन यांनी हरभजनला वर्णद्वेषाच्या आरोपातून मुक्त केले आहे. पण मैदानात आक्षेपार्ह शेरेबाजी केल्यावरून त्याला लेव्हल २.८ नुसार दोषी ठरविले आहे. त्यासाठी त्याला मॅच फीच्या पन्नास टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.

हरभजनन वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचा आरोप अँड्र्यू सायमंड्स सिद्ध करू शकला नाही. त्याचवेळी सिडनीतील दुसऱ्या कसोटीत त्याला हरभजन बिग मंकी म्हटला होता हेही सिद्ध होऊ शकले नाही.

आरोप सिद्ध न होऊ शकल्याने हरभजनवर घातलेली तीन सामन्यांची बंदीही मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे तीन फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत भज्जी सहभागी होऊ शकणार आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना हरभजनने आपल्याला दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे. या वादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हरभजनच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्याच्यावरील वर्णद्वेषी आरोप मागे न घेतल्यास तिरंगी मालिकेत सहभागी होणार नाही, असा इशाराही मंडळाने दिला होता.

मंगळवारी न्यायालयाची कारवाई सुरू असताना मंडळाचे सचिव निरंजन शहा व रत्नाकर शेट्टी तसेच वकिल विजय मनोहर हे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हरभजनच्या संपर्कात होते.

हरभजनवर भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान तिसऱ्या क्रिकेट कसोटीत अँड्र्यू सायमंड्सविरूद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचा आरोप होता. . यानंतर सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांसाठी बंदी घातली होती.

ऑस्ट्रेलियाचा खोटारडेपणा उघड
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा