Dharma Sangrah

हातात नाही चित्रपट आणि चोखंदळपणाचा आव

Updated: शुक्रवार, 18 जानेवारी 2008 (15:55 IST)
' गॅगस्टर', वो लम्हे',आणि 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटात कंगनाने छान अभिनय केला होता. यातील दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. पण कंगनाला मात्र फारसा फायदा झाला नाही. तिच्याजवळ सध्या केवळ दोन चित्रपट आहेत. यात मधुर भंडारकरचा फॅशन आणि समीर कर्णिकचा 'रोशन' यांचा समावेश आहे.

कंगना चांगली अभिनेत्री आहे. अंगप्रदर्शनालाही ती लाजत नाही. असे असूनही निर्माते तिला चित्रपटात घेण्यास उत्सूक नाहीत. पण कंगना म्हणते, मी मला कथा आवडली तरच चित्रपटात काम करते. अन्यथा नाही. म्हणूनच माझे चित्रपट कमी आहेत. मधुर भांडारकरच्या 'फॅशन' बद्दल तिला खूप आशा आहेत.

कंगनाचे वर्तन आणि लाइफ स्टाईल तिच्या यशात अडथळा ठरत आहेत, असे बोलले जाते. तिच्या बिनधास्त वागण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये कायम सुरू असते. आदित्य पंचोलीसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा देखिल रंगल्या आहेत. चित्रपट निर्माते शिस्तप्रिय अभिनेत्रींनाच प्राधान्य देतात. तिथेच कंगनाचा पत्ता कट होतो.

कंगना प्रत्येक गोष्ट मन लावून शिकत आहे. कमी चित्रपट करीत असल्यामुळे इतर वेळेत ती शास्त्रीय नृत्य, संगीत, योग आणि पियानो वाजविणे शिकत आहे. या सर्व गोष्टींनी अभिनय सुधारतो, असे तिचे म्हणणे आहे.

वीस वर्षाची कंगना स्वत:तच रमणे पसंत करते. ती स्वत:चीच चांगली मैत्रीण असून तिला कोणा पुरूष मित्रांची गरज वाटत नाही. पार्टी किंवा समारंभात एकटेच जाणे तिला आवडते.

काही खास ठिकाणी बॉयफ्रेंड हवा असे तिला वाटते. पण रोजच्या जीवनात त्याची गरज आहे, असे तिला वाटत नाही. आपण अजूनही लहान आहोत, असे तिला वाटते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'बद्दल म्हटले, चित्रपटाचा बचाव करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती

इंदूरमधील ऐतिहासिक पंढरीनाथ मंदिर आणि आषाढी एकादशीची परंपरा

अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूची लागण, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला

महाराष्ट्रातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखली जाणारी अत्यंत प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे

दीपिका चिखलियाने साई पल्लवीच्या सीता रूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

Show comments