Dharma Sangrah

रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट प्रत्येकालाच मिळणार ई-रेशन कार्ड

Updated: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (12:55 IST)
 
-पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारकांना या अगोदर हस्तलिखित रेशन कार्ड देण्यात येत होते. शासन निर्णयानुसार आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई – रेशनकार्ड भेटणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता मोबाईल मध्ये रेशन कार्ड ठेवता येईल. रेशनकार्ड धारकांना ई-रेशन कार्ड वाटप करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत चालू होणार असल्याचे कळते.
 
आता प्रत्येकालाच मिळणार ई-रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका)
 
रेशन कार्डधारकांनी संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर ती माहिती संबंधित पुरवठा निरीक्षकाकडे मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेशन कार्ड धारकांना ई – रेशन कार्ड भेटणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे.
 
ई-रेशन कार्ड चे फायदे व वापर कसा करायचा?
ई – रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई – रेशन कार्ड ऑनलाइन व डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई – रेशन कार्ड वर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्रधान्य कुटुंब योजना (PHH) आणि राज्य योजनेअंतर्गत APL Farmer, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NPH) असे नमूद करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ई – रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका) सुविधा साठी शासन फी आकारणार नाही असा निर्णय शासनाने घेतला.
 
E-Ration Card Download: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेच्या शिधापत्रिका धारक हे गरीब व गरजुवंत कुटुंबातील लोक आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षण योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सर्वांनी वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन रेशन कार्ड सुविधा/सेवा शुल्क न करता सदरील योजनेची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
अर्जदार यांनी ई – रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेनुसार ऑनलाइन ई – रेशनकार्ड (ई – शिधापत्रिका) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
ई – रेशनकार्ड कधी मिळणार?
रेशन कार्ड धारकांना 1 सप्टेंबर पासून ई – रेशन कार्ड वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्याला मार्फत तहसीलदार पुरवठा निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.
 
Edited By- Ratnadeep ranshoor

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुरुग्राम हिट-अँड-रन प्रकरणी मुख्य आरोपीला राजस्थानच्या दौसा येथून अटक, हत्येच्या प्रयत्नाचा आरोप दाखल

उदयपूरमध्ये महिलेवर भीषण हल्ला, डोळ्यात मिरची पूड फेकली, नाक कापले आणि नवव्या मजल्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला

मुंबईत वायू प्रदूषणावर बीएमसी आणि एआरएआयने एमएमआरमध्ये सर्वेक्षण सुरू केले

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला, ४० वर्षीय झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने इतिहास रचला

पुढील लेख
Show comments