Marathi Biodata Maker
✕

बदला दोन हजार रुपयांची नोट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Updated: मंगळवार, 23 मे 2023 (12:22 IST)
 
 2  हजार रुपयांच्या फक्त 10 नोटा म्हणजे फक्त 20 हजार रुपयेच बदलता येणार का?
 
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी 2 हजार रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला 2 हजार रुपयांच्या 10 नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्यास संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून 2 हजारांच्या 100 नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
 
 दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
 
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्र काढण्याची आवश्यकता नसणार आहे.
नोटा कुठे बदलू शकतो?
तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच आरबीआयच्या 16 प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरबीआयने म्हटलं की, ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक दुर्गम भागात त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही.
 
घरात राहूनही 2 हजाराची नोट बदलता येणार?
नागरिकांना घरी बसूनही दोन हजाराची नोट बदलू घेता येणार आहे. जर बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्हाला घरी बसून नोटा बदलून घेता येतील. बँकमित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलून देतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्हाला 2000 रुपयांच्या दोन नोटा म्हणजे 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जातील.
 
2000 रुपयांची नोट का बंद झाली?
2000 ची नोट आरबीआयने चलनातून बाद केल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे. या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्या. त्यांचे चलन बाकीच्या नोटांच्या तुलनेत कमी होते.
 
2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?
सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते मात्र 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा त्या बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण जर 2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, ग्राहकांनी पहिला संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेने 30 दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तकार नोंदवता येईल.
 
दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
 
उत्तर : RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटा द्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
 
6) बँक खातं नसेल तरीही 2 हजारांच्या नोटा बदलता येतील का?
 
उत्तर : होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
 
दोन हजारांच्या नोटा तुमचं खात जिथे असेल तिथेच बदलता येणार का?
 
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्ही नोटा बदलू शकता.
 
 ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या 10 पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
 
उत्तर : ज्येष्ठ नागरिकही एका वेळी 10 नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
 
7) दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत किती आहे?
 
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घेता येणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

एमपीएससी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रोहित पवारांनी सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला असून पुणे बंदचा इशारा दिला

आष्टी-शहीदमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

LIVE: MPSC आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रोहित पवार यांनी सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम देत पुणे बंदचा इशारा दिला

Flight Tickets To Get Costlier From Oct 6 इंडिगोचा विमान प्रवास महागणार; ६ ऑक्टोबरपासून इंधन अधिभारात वाढ

Aadhaar Name Correction आधारमध्ये नाव बदलण्याबाबतचे नवीन नियम आता लागू!

पुढील लेख
Show comments