Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार इन्शुरन्सबद्दल 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Updated: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (23:21 IST)
 
जर तुम्ही याबाबतीत काळजी घेतली तर, तुम्ही अत्यंत कमी मोबदल्यात देखील अनपेक्षित खर्च टाळू शकता.
 
थर्ड पार्टी इन्शुरन्स
आपल्या वाहनामुळं अपघातात दुसऱ्या वाहनाला किंवा व्यक्तीला झालेल्या नुकसानाचं कव्हरेज म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स असते.
 
भारतीय मोटर वाहन कायद्यानुसार कारसारख्या मोठ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य बाब आहे.
 
त्यामुळं डीलर कार विक्री करताना ही बाब लक्षात घेऊन नोंदणीच्या खर्चाबरोबरच इन्शुरन्सचा प्रीमियमही खरेदी करणाऱ्याकडून घेत असतात.
पण या इन्शुरन्समध्ये पॉलिसी असलेल्या व्यक्तीच्या स्वतःच्या वाहनाचं नुकसान मात्र कव्हर होत नसतं. त्यामुळंच स्वतःच्या वाहनालाही इन्शुरन्स कव्हर हवं असल्यास त्यासाठी स्वतंत्र इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागते.
 
वाहतूक पोलीस ज्यावेळी कारच्या कागदपत्रांची तपासणी करत असतात त्यावेळी नोंदणीच्या कागदपत्रांसह ड्रायव्हिंग लायसन्स आणि उत्सर्जन प्रमाणपत्र ही कागदपत्रं दाखवणं गरजेचं असतं.
 
त्यामुळं अपघाताच्या प्रकरणाबरोबरच, वाहतूकसंबंधी गुन्ह्यांपासून दूर राहण्यासाठी थर्ड पार्टी आणि स्वतःच्या वाहनाचा इन्शुरन्सदेखिल काढायलाच हवा.
 
IDV म्हणजे काय?
इन्शुरन्स डिक्लेर्ड व्हॅल्यू (IDV)ही वाहनांच्या इन्शुरन्समधील सर्वात महत्त्वाची बाब आहे. वाहनाची चोरी झाली तेव्हाही हे उपयोगी ठरत असते.
 
इन्शुरन्स कंपनीच्यानुसार आपल्या वाहनाची सध्याची किंमत किती आहे? हे IDV द्वारे समजू शकते. जर आपल्या वाहनाचं एवढं नुकसान झालं असेल की, त्याची दुरुस्ती करणं शक्यच नसेल अशावेळी इन्शुरन्स कंपनी IDV नुसार ठरवलेली किंमत आपल्याला देत असते.
तसंच जर आपली गाडी चोरी झाली तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला जास्तीत जास्त जी रक्कम देत असते ती असते IDV.
 
त्यामुळं आपल्याला बाजारात आपल्या गाडीची सध्याची किंमत काय आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार कोणती कंपनी आपल्याला योग्य IDV देईल याचा शोध घ्यायला हवा.
 
सध्या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या पॉलिसींमध्ये ते ठळकपणे दिलेलं असतं. तसं पाहिलं तर IDV बाबत फार काळजी करण्याची गरज नसते. पण अगदीच निष्काळजी देखील राहता कामा नये.
 
'नो क्लेम बोनस' म्हणजे काय?
सर्व इन्शुरन्स पॉलिसी वार्षिक असतात. जर एखाद्या वर्षी तुम्ही काहीही क्लेम केला नाही, तर त्याच्या पुढच्या वर्षीच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रिमियममध्ये डिस्काऊंट दिलं जातं. त्याला 'नो क्लेम बोनस म्हणतात.
 
विविध पॉलिसींमध्ये नो क्लेम बोनस 10% ते जास्तीत जास्त 25% पर्यंत असतो. तसंच नो क्लेम पॉलिसींमध्ये एका कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेणंही सहज शक्य असतं.
 
नो क्लेम बोनस ची सुविधा असलेली पॉलिसी घेतल्यास आपल्याला भविष्यात भरावा लागणारा प्रिमियम कमी होऊ शकतो.
 
जास्तीत जास्त नो क्लेम बोनस देणाऱ्या पॉलिसींचा प्रिमियम काहीसा जास्त असतो. वाहनधारक किरकोळ अपघात किंवा दुरुस्ती खर्चासाठी क्लेम करण्याऐवजी स्वतःच्या खिशातून खर्च करूनही नो क्लेम बोनचा लाभ घेऊ शकतात.
 
रायडर्सबद्दल योग्य माहिती घ्या
कंपन्या कार इन्शुरन्सशिवाय इतरही अनेक सेवा देऊ करतात.
 
या सर्व गोष्टी पॉलिसी घेण्याआधीच समजून घ्यायला हव्या. काही कंपन्या केवळ त्यांच्या ठराविक सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून कॅशलेस इन्शुरन्स देऊ करतात.
 
अनेकदा हे काहीसं विचित्र वाटू शकतं. तसंच कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरबरोबर करारही असतात. त्यानुसार जर गाडी रस्त्यात कुठेही बंद पडली तर ती त्यांना स्वतःला सर्व्हिस सेंटरपर्यंत आणावी लागते.
 
तुम्ही हे सर्व काळजीपूर्वक जाणून घेऊन, नंतरच गाडीसाठी इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हवी.
 
सध्या भारतात 32 कंपन्या वाहन विम्याची सेवा पुरवतात.
 
न्यू इंजिया अश्युरन्स, एचडीएफसी, अर्गो, बजाज अलायन्झ, रॉयल सुंदरम या त्यापैकी काही आघाडीच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत.
 
(Note: हा लेख केवळ संबंधित विषय समजण्यासाठी म्हणून आहे. संबंधित निर्णय हा तुमच्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच घ्यावा.)
 






Published By- Priya Dixit
 
 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

नागपूरमध्ये बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मुंबईतील घाटकोपरमध्ये भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

आयफोन १८ प्रो चा नवीन अवतार लीक, या रंगांमध्ये लॉन्च होऊ शकतो

पुढील लेख
Show comments