Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

Written By wd
Updated: सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (13:35 IST)
 
मोदी सरकारने घोषणा केलेल्या पहिल्या बुलेट ट्रेनवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादच का हवी, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले, असे सांगत त्यांनी भाजपच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णावर घणाघात केला.
 
पंतप्रधान अमेरिकेत गेले तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ‘केम छो’ म्हणून मोदींचे स्वागत केले. मोदी अमेरिकेला जाऊन आले, आम्हाला अभिमान वाटला, परंतु तुमचा छुपा अजेंडा काय होता, ओबामांनी मोदींचे केम छो, म्हणत स्वागत केले. त्यावेळी मोदींनी हिंदी बोलणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. याशिवाय अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्येही गरबाचे आयोजन केले होते. हे सर्व पाहता मोदी देशाचे प्रतिनिधित्व न करता गुजरातचे प्रतिनिधित्व करत आहेत काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
 
हे स्वबळ कसले ? 
 
भाजपने विधानसभेसाठी जे उमेदवार दिले, ते बहुतांशी बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे हे कसले स्वबळ आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. एवढेच नव्हे, तर मोदी यांनी गोपीनाथ मुंडे जिवंत असते, तर माझी यायची गरज नव्हती, असे सांगून त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढल्याचे सिद्ध झाले आहे. यावेळी त्यांनी अन्य पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या उमेदवारांची यादीच दाखविली. खरे तर या पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बळ दिले आहे. आता ते बेटकुळ्या काढून दाखवत आहेत, अशा शब्दातही भाजपवर टीकास्त्र सोडले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Maruti Suzuki August Offers: मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय तगडा डिस्काउंट, वाचवा १.३५ लाख

सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का, सोलापूरमध्ये १५ नगरसेवक आणि महापौर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील

कृषी अवजारे बँकेसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शॉर्ट्स घातल्यावरून पर्यटकांना मारहाण; ८ जणांविरोधात एफआयआर दाखल

एफडीएने मुंबईत मोठी कारवाई करत, ऑथर्स क्लबसह सहा आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले

Show comments