Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनादी मी, अनंत मी अवध्य मी

- कै. आचार्य बाळाराव सावरकर

Updated: मंगळवार, 28 मे 2013 (12:19 IST)
आपल्या देशावर असलेले परकीय इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले. या देशभक्तांत एक गट होता शस्त्रवादी क्रांतिकारकांचा. हा गट सांगे इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी आपण येथील इंग्रज अधिकार्‍यांच्या मनात भीति उत्नन्न केली पाहिजे. त्यांना शस्त्राने ठार मारले पाहिजे. या गटात 1857 चे नेते नानाराव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रभृतिंची नावे प्रमुख आहेत. असा सशस्त्र शक्तीचा पुरस्कार करण्यासाठी श्री. विनायक दामोदर तथा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुण वयात वीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे, चाफेकर बंधू यांचे पोवाडे रचले. शिवाजी महाराजांची आरती केली.

बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सन 1906 मध्ये 23 व्या वर्षी ते इंग्लंडची राजधानी लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी इटलीचे रामदास जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र लिहिले. तसेच 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हे ही पुस्तक लिहिले. ही पुस्तके वाचणारा वाचक देशभक्त बनेल, आपले राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करील या भीतीने इंग्रज सरकारने ही पुस्तके छापण्यास आणि वाचण्यास बंदी घातली. ही पुस्तके छापण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे थोरले बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांस ब्रिटीश सरकारने जन्मठेप व काळेपाण्याची शिक्षा‍ दिली. या शिक्षेचा सूड घेण्यासाठी मदनलाल धिंग्रा यांनी भर लंडनमध्ये कर्झन वायली या इंग्रज ‍अधिकार्‍यास सन 1909 मध्ये गोळी घालून ठार मारले. त्याच्या पाठोपाठ नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तरुणाने गोळी घालून वध केला.

जॅक्सनला मारण्यासाठी वापरले गेलेले पिस्तूल सावकरांनी पाठविलेले होते असे समजून ब्रिटीश सरकारने लंडनमध्ये सावकरांना पकडले आणि भारतात पाठविले. भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस या सिंधूद्वाराजवळ नौकेतून समुद्रात उडी मारली! आणि ते ब्रिटीश शिपायांनी त्यांच्यावर झालेल्या बंदुकीच्या गोळ्या चुकवत पोहत पोहत फ्रान्सच्या किनार्‍यावर पोचले. ब्रिटीश पोलीसही त्यांच्या पाठोपाठ होडीतून तेथे पोचले आणि त्यांनी सावरकरांना पकडून पुन्हा बोटीवर आणले! आणि त्यांना मारण्याच्या धमक्या देऊ लागले. तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितले मला हात लावाल तर लक्षात ठेवा माझे मित्र तुम्हाला सोडणार नाहीत, तेथे त्यांनी कविता रचली 'अनादी मी, अनंत मी अवध्य मी भला। मारिल रिपु कवण असा जगती जन्माला?
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

Show comments