Marathi Biodata Maker
✕

Yoga for Confidence आत्मविश्वास वाढवण्यासाठी या योगासनांचा सराव फायदेशीर आहे

Updated: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (14:38 IST)
 
योग तज्ज्ञांच्या मते आत्मविश्वासासाठी निरोगी मन असणे आवश्यक आहे. अशात आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे मानता येईल. नियमित योग केल्याने केवळ शरीर बळकट होत नाही तर मानसिक शक्ती वाढते.
 
दररोज या योगासनांचा सराव केल्याने आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊ या की कोणते आहे असे योगासन-
 
अधोमुख शवासन योग - अधो मुख शवासन किंवा डाऊनवर्ड फेसिंग डॉग पोज साधारणपणे पाठ आणि मणक्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. सोबतच या योगामुळे मानसिक आरोग्याला चालना देणे तसेच आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यातही फायदा होऊ शकतो. अधोमुख शवासन योगासनामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन देखील सुधारतं. मेंदूतील रक्ताभिसरणाला चालना देण्यासोबतच हा योग सकारात्मक उर्जेच्या संचारातही हे खूप फायदेशीर मानला जातो.
 
विरभद्रासन योग- विरभद्रासन योगाचा नियमित सराव केल्याने पाठीचे, नितंबांचे आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. शिवाय शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी देखील या योगाचा अभ्यास फायदेशीर मानला गेला आहे. हा योग आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सकारात्मक संवादाला चालना देण्यासाठी देखील फायदेशीर आहे. विरभद्रासन योग संपूर्ण शरीराच्या स्नायूंना ताणण्यासाठी आणि सांधे ताणण्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.
 
भुजंगासन - कोब्रा पोझ किंवा भुजंगासन योग हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. शरीराच्या सर्व स्नायूंना ताणण्यासोबतच हा योग रक्ताभिसरणाला चालना देण्यासाठीही फायदेशीर आहे. मानसिक आरोग्याला चालना देण्यासोबतच भुजंगासन योगाचा सराव आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments