पॉल सुरवातीला पक्का ज्यू होता. शिकण्यासाठी तो जेरूसलेम येथे आला होता. तेथे इतर ज्यूंप्रमाणे तो ही ख्रिश्चन धर्मियांवर अत्याचार करीत असे. येशूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्याला आळा घालण्याचा विडा त्याने उचलला होता.
त्यासाठी त्याने या धर्माविरूद्ध लढा पुकारला. त्यासाठी एकदा पॉल ख्रिश्चन धर्मियांना त्रास देण्यासाठी शिपाई घेऊन दमिश्क नगरात जात होता. त्यावेळी त्याला प्रभू येशूने दर्शन दिले. त्यावर पॉलने त्याला तू कोण आहेस, असे विचारले.
प्रभू येशूने सांगितले, की ज्याला तू त्रास देत आहेस तो येशू मी आहे. प्रभूच्या दर्शनाने पॉलमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडले. ख्रिश्चन धर्म स्वीकारून त्यांनी लगेचच धर्मप्रसार सुरू केला. दूरदूरच्या देशांत त्यांनी धर्माचा प्रसार केला.
ठिकठिकाणी मठ, चर्च स्थापन केले. त्यांचाही खूप छळ झाला. अखेरीस सम्राट नीरोने त्याचे मुंडके उडविले. पण पॉल आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांनी लिहिलेली १४ सुंदर पत्रे धर्माविषयी विवरण करणारी आहेत.