मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

दु:खाचा दिवस, मोहरम

NDND
इराकची राजधानी बगदादपासून 100 किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ऐतिहासिक युध्द झाले. त्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. या करबला गावामुळेच जगातील प्रत्येक शहरात 'करबला' नावाचे पवित्र स्थान उभारण्यात आले आहे व या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो.

हिजरी संवतच्या पहिल्या महिन्यात मोहरमची 10 तारीखेला (10 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 10 ऑक्टोबर,680) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी मारून टाकले होते, तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. याच दिवशी दु:खाचा दिवस म्हणून मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.

असे सांगितले जाते की, करबलामध्ये एका बाजूला केवळ 72 तर दूसर्‍या बाजुला यजिद यांचे तब्बल 40 हजार सैनिक होते. 72 जणांमध्ये महिला-पुरूष व 51 मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुसर्‍या बाजुला यजिद यांच्या सैन्याची कमान उमर इब्ने सअद यांच्या हातात होती.
NDND

युध्दाचे कारण -
इस्लाम धर्माचे पाचवे खलिदा अमीर मुआविया यांनी खलिदाच्या निवडणुकीत समाचाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिध्द होता. समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली होती. त्यामुळे त्याकाळच्या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खलिफा झाल्याचे रूचले नाही.

यजिदने समाजाविरूध्द बंड करून इतर नागरिकांसोबत त्याने हजरत हुसैन यांनी त्याला खलिदा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिदा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. त्यानंतर युध्द झाल्याने हुसैन शहीद झाले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना 'शहीद-ए-आजम' म्हटले जाते.

हजरत हुसैन यांनी मुठभर नागरिकांच्या मदतीने त्या काळच्या जाचक हुकूमशाहीविरूध्द कंबर कसली होती. हुसैन यांनी केलेले महान कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. हजरत हुसैन यांच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा काही उत्सव नसून दु:खाचा दिवस आहे. हजरत हुसैन यांचे आंदोलन असा संदेश देते की, प्रत्येक नागरिकाने सत्याच्या मार्गाने गेले पाहिजे.

युध्दानंतरच शिया व सुन्नी अशा दोन वर्गात मुस्लिम धर्माचे विभाजन झाले. हळूहळू शिया वर्गातच मोहरमचे महत्व अबाधित राहिले आहे.