बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

मानवतेचा संदेश देणारा रमजान महिना

मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा मुकद्दस महिना नववा असतो. प्रत्येक वर्षाच्या या महिन्यात रोजा ठेवला जातो. एक महिन्यापर्यंत सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा करतात.

NDND
हदीसनुसार या शुभ महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि वाईट प्रवृत्तीला कैद केले जाते. दया आणि प्रामाणिकतेची सुरवात या महिन्यापासून होते. त्यामुळे प्रत्येक मुसलमान या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान हजरत मोहम्मद सल्लल्लाअलैहवसल्लमच्या उम्मतचा महिना आहे. या महिन्यात रोजे ठेवणार्‍यांना खूप पुण्य मिळते आणि याच दिवसात जो मुसलमान शिद्दतबरोबर खुदा-अल्ला तालाची इबादत आणि कलामपाकची तिलावत केली तर त्याने आजपर्यत केलेले सर्व पाप धुतले जाते.
रोजा करणारा मुसलमान कयामतच्या दिवशी अल्लाचा प्रामाणिक बंदा म्हणून ओळखला जातो. हा महिना म्हणजे मनुष्याच्या वाईट प्रवृत्तीला नियंत्रणात ठेवणारा सर्वात श्रेष्ठ महिना आहे.


या दिवसात वर्षभर गुन्हेगारी करणार्‍या मनुष्याच्याही मनात असे येते की आपण केलेल्या गुन्ह्यांचा जवाब अल्लाला द्यायचा आहे. याचा अर्थ रमजान-उल-मुबारक गुन्हा करण्यास रोखून मनुष्याला आपल्या ईश्वराप्रती सदाचारी व प्रामाणिक राहण्याचे सांगतो. रमजानचा हा पवित्र व प्रामणिक महिना मनुष्याला स्वत: ची इंद्रिये ताब्यात ठेवण्याची तालीम देतो. त्याचबरोबर भुकेलेल्याची भुक, तहानलेल्याची तहान भागविणे व मानवतेचा धर्म पाळण्याचा संदेश रमजान देतो.

मानवतेचे कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला रमजान देतो. रोजा करणार्‍या मुसलमानावर अल्लाचा आशीर्वाद असतो. या दिवसात मनुष्य नमाज पठण आणि अल्लाच्या प्रेमात दंग झालेला असतो. आपल्या डोक्यातील वाईट विचार कायमचे काढून टाकण्याचा उद्देश यामध्ये असतो. अशा प्रकारे हा महिना मानवाला मानवतेचा संदेश देऊन प्रेमाने, बंधुभावाने एकत्र नांदण्याचा संदेश देतो. मनुष्याला दुसर्‍याची मदत करण्यासाठी रस्ता दाखविण्याचे काम केले जाते.

रमजानच्या काळात सकाळी चंद्र उगवण्याच्या अगोदरपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाऊ नये. रोजा सोडल्यानंतरच अन्नपदार्थ खाण्याची परवानगी आहे. केवळ उपाशी राहणे म्हणजे रोजा नाही. ईश्वरालाही उपाशीपोटी राहणे आवडत नाही. जे लोक प्रामणिकपणे रोजा पूर्ण करतात त्यांच्यावर ईश्वर प्रसन्न असतो. रोजा करणारा प्रत्येकजण आपल्याला वाईटापासून दूर ठेवून पावित्र्य पाळण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे प्रत्येकाने ईश्वरापुढे आपल्या गुन्ह्यांची माफी मागावी आणि यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत सहभागी होणार नसल्याची प्रतिज्ञा करावी. दिवसातून पाच वेळा नमाज पठण केले पाहिजे. फजर, जोहर, असर, मगरीब आणि इश या पाच नमाजाशिवाय इशाच्या नमाजाबरोबर नमाज तराबीह अदा करणे आवश्यक आहे.

रमजानच्या महिन्यात एकीकडे वाईटापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे मानवता प्रस्थापित करणे हे प्रत्येक मुसलमानाला आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याने मानवतेचे नाते घट्ट करून रमजान-उल-मुबारकच्या प्रामाणिक आणि दयेचा संदेश जगभर पसरविला पाहिजे.