सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. अमिताभ बच्चन
Written By वेबदुनिया|

माझे कुटुंब हेच माझ्यसाठी मोठे गिफ्ट!

WD
जयाने मला अभिषेक व श्वेता ही दोन सुंदर गिफ्ट यापूर्वीच दिली आहेत. आता घरात सूनबाई ऐश्वर्या आणि इवलीशी नात आराध्या यांची चहलपहल आहे. भरल्या गोकुळाचे हे गिफ्ट मला मिळाले आहे. माझे कुटुंब हेच माझ्यासाठी मोठे गिफ्ट आहे आणि त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. वाढदिवसाचे अप्रुप लहान वयातच असते. गिफ्‍ट्‍स आणि प्रेझेंट्‍स मिळणार म्हणून त्या वयात प्रत्येक जण वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहतो. आई-वडिल काय गिफ्ट देणार याची प्रचंड उत्सुकता असते, पण बालपण मागे सरते आणि तारुण्यात प्रवेश होतो, तेव्हा 'ती' उत्सुकता संपते.

मी चित्रपट क्षेत्रात आलो तेव्हा मित्रपरिवार माझा वाढदिवस साजरा करायचे, पण आजही मला वाटते, की वाढदिवस हा सुद्धा इतर दिवसांसारखाच असतो. या खास दिवसापासून मी नेहमीच स्वत:ला दूर ठेत आलो आहे. जेव्हा वाढदिवस नजीक येतो तेव्हा कुटुंबाला माझे विनंतीवजा आदेश असतात की काही विशेष करू नका रे बाबांनो, मला नाही आवडत... छोट्या आणि सुखी-शांत कुटुंबासह दिवस व्यतीत करणे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.