शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

Christmas
India Tourism : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भारतात अनेक ठिकाणी खूप सुंदर आणि उत्साही वातावरण असते. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव असलेल्या आणि शांत, थंड हवामान असलेल्या ठिकाणी नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. चर्चची भव्य सजावट, मध्यरात्रीची प्रार्थना, क्रिसमस ट्री, लाईट्स, केक, सांता क्लॉज आणि खास जेवण यामुळे खूप मजा येते. याशिवाय हिल स्टेशन्समध्ये थंडी आणि बर्फामुळे नाताळला वेगळीच मजा येते. तसेच आज आपण भारतातील नाताळ स्पेशल प्रमुख पर्यटन स्थळे पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. 
 
नाताळ स्पेशल प्रमुख पर्यटन स्थळे 
गोवा- 
गोवा हे नाताळसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. पोर्तुगीज संस्कृतीमुळे येथे नाताळचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. जुन्या चर्चमध्ये मध्यरात्रीची प्रार्थना आणि बीच पार्ट्या खास असतात. 
 
दमन आणि दीव- 
दमण आणि दीवयेथेही गोव्याप्रमाणेच पोर्तुगीज वसाहतीचा प्रभाव असल्याने, नाताळला भव्य रोषणाई, संगीत आणि डान्सचे आयोजन केले जाते. 
 
शिलाँग मेघालय- 
शिलाँगला 'पूर्वेकडील स्कॉटलंड' म्हणतात. येथील ख्रिस्ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे, संपूर्ण शहर आकर्षक दिव्यांनी सजवले जाते. येथील चर्चमधील कोरस सिंगिंग प्रसिद्ध आहे. 
कोची- 
केरळ मधील कोचीमध्ये 'कोचीन कार्निव्हल' असतो, ज्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन एकत्र होते. सुंदर चर्च, रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवता येतात. 
 
मुंबई- 
महाराष्ट्र मधील मुंबईतील बांद्रा स्टँड आणि आजूबाजूचा परिसर ख्रिसमससाठी खास रोषणाईने सजलेला असतो. येथील ऐतिहासिक चर्चमध्ये मध्यरात्रीच्या प्रार्थनेसाठी गर्दी होते. 
 
कोलकाता-
पश्चिम बंगाल येथील पार्क स्ट्रीट ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या रोषणाईसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे 'कलकत्ता ख्रिसमस फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते. 
शिमला- 
हिमाचल प्रदेश मधील बर्फाच्छादित वातावरणात ख्रिसमस साजरा करायचा असेल, तर शिमला एक उत्तम पर्याय आहे. येथील ऐतिहासिक क्राइस्ट चर्च आणि मॉल रोडवरील उत्साह बघण्यासारखा असतो. 
 
पॉंडिचेरी- 
पॉंडिचेरी फ्रेंचांचा प्रभाव असलेले हे ठिकाण शांत आणि सुंदर आहे. येथील चर्च  आणि सुंदर कॅफेमध्ये नाताळची मजा घेता येते.