सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. अमिताभ बच्चन
Written By वेबदुनिया|

हॅप्पी बर्थडे बिग बी!

WD
गेल्या चार दशकापासून विविधांगी भूमिका सकारून देशासह जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महानायक बिग बी आज 72व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. बॉलिवूडचा शेहनशहा, सुपरस्टार ऑफ दि मिलेनियम, बिग बी अशी अनेक विशेषणे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाने दिली आहेत. दस्तरखुद्द बिग बी यांना वाढदिवसाचे फारसे आकर्षण नसले तरी त्यांच्या कुटुंबासाठी आणि चहत्यांसाठी हा एक महाउत्सवच असतो. तुम जियो हजारो साल म्हणतं, त्यांच्यासारखी वेशभूषा परिधान करून, हातत बुके घेऊन त्यांचे असंख्य चाहते शुक्रवारी सकाळपासूनच त्यांच्या बंगल्यासमोर शुभेच्छा देण्यासाठी जमले आहेत.

अमिताभ सध्या होस्ट करीत असलेल्या केबीसीच्या सेटवर देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 100 वर्षीय बेरनांदिनी डिसुजा या बिग बींच्या सर्वात वयोवृद्ध चाहतीने सेटवर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. बेरनांदिनी ह्या अल्झाईमरच्या रूग्ण असून त्यांना बिग बीं व्यतिरिक्त काहीच आठवत नाही. अगदी त्यांचा चित्रपट पाहिल्याशिवाय त्या जेवण देखील करत नाहीत. अशा आपल्या अनोख्या चाहतीला भेटून बिग बी देखील सुखावले. आपल्यासाठी हे अनमोल गिफ्ट असल्याचे बिग बी म्हणाले.