सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (16:20 IST)

Asia Cup Controversy: आशिया चषकाचा पहिलाच सामना वादाच्या भोवऱ्यात

आशिया कप 2022 चा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाच वेळच्या चॅम्पियन श्रीलंका संघाचा आठ गडी राखून पराभव केला. मात्र, हा सामना आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. श्रीलंकेच्या चाहत्यांनी पंचांवर आपल्या संघाशी 'बेईमान' असल्याचा आरोप केला आहे. 
 
श्रीलंकेचा संघ या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला गेला होता. मात्र, संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात श्रीलंकेने दोन विकेट गमावल्या. कुसल मेंडिस दोन धावांवर तर चारिथ अस्लंका शून्यावर बाद झाले. दुसऱ्या षटकात नवीन-उल-हकने पथुम निसांकाला यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजकडे झेलबाद केले. मात्र, मैदानी पंचांनी नवीनचे पहिले अपील फेटाळून लावत पथुमला नाबाद दिले. 
 
यानंतर, अफगाणिस्तान संघाने निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) वापरली. चेंडू बॅटला लागल्याचे थर्ड अंपायरच्या लक्षात आले. अशा स्थितीत तिसर्‍या पंचांनी निशांकाला आऊट दिला. रिप्ले दाखवतात की चेंडूने बॅटची हलकी किनार घेतली आहे. मात्र, अल्ट्रा एजमध्ये फारसा फरक पडला नाही. यावर चाहत्यांनी पंचांवर निशाणा साधला आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. खुद्द श्रीलंकन ​​संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता.

पंचांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला.अशा स्थितीत श्रीलंकेच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, मैदानावरील पंचांनी नॉट आऊट दिला तेव्हा तिसऱ्या पंचाने आऊट कसा दिला.
 
अफगाणिस्तानचा पुढचा सामना बांगलादेशशी 30 ऑगस्टला होणार आहे. तर , श्रीलंकेचा संघ 1 सप्टेंबरला त्यांच्या पुढील सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे.