आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण
27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे.टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून मीडिया रिपोर्ट्सनुसार ते आशिया कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना होणार होता.मात्र, प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आगामी स्पर्धेसाठी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आशिया कपनंतरच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होणार होती.
भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडची नोव्हेंबर2021 मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली.अलीकडेच त्यांना भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी विश्रांती देण्यात आली होती.त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची या दौऱ्यासाठी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केला.
गेल्या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धेत गट टप्प्यात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या T20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल केला आहे आणि संघाला चांगले परिणाम मिळाले आहेत.पण आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक द्रविड कोविड पॉझिटिव्ह असणे ही संघासाठी चांगली बातमी नाही
आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.