सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (17:27 IST)

दैनिक राशीफल (31.08.2021)

मेष : प्रगतीसाठी अनुकूल काळ. परिस्थितीत सुधारेल. आर्थिक आवक ही चांगली होईल. विशेष महत्त्वाचे काम कराल. आर्थिक समस्यांवर तोडगा निघेल. कुटुंबातही उत्साहाचे वातावरण राहील. 
 
वृषभ : शुभ कार्यात सहभाग राहील. घर, प्लॉट खरेदीचे योग आहेत. जोखीम न स्विकारणेच योग्य आहे. प्रगतीचा काळ. आधी केलेल्या मेहनतीचे फळ या काळात मिळणार आहे. 
 
मिथुन : सामान्य सुधारणा जाणवेल. प्रगतीची गाडी हळू हळू मार्गक्रमीत करेल. चांगल्या संधीचे सोने करावे लागेल. तरी देखील चेहर्‍यावरचा उत्साह हरवेल. अन
 
कर्क : नोकरीत कामाची प्रशंसा होणार आहे. संधीचे सोने कराल. आर्थिक योग उत्तम. अचानक लाभ होणार आहे. मनाप्रमाणे खरेदी‍ करू शकाल. वैयक्तीक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील.
 
सिंह : प्रगतीचा आलेख उंचावणार आहे. महत्त्वाच्या जबाबदार्‍या पूर्ण कराल. मित्रमंडळीकडून सहकार्य लाभेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. व्यापार व्यवसायात यश मिळेल. परिश्रमाचे चीज होईल. आर्थिक योग उत्तम राहील. 
 
कन्या : नोकरीत प्रमोशन संभवते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्यासाठी‍ संमिश्र काळ आहे. सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. 
 
तूळ : यश मिळवून देणारा काळ. व्यापार- व्यवसायात प्रगती संभवते. अडकलेला पैसा वसूल होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. 
 
वृश्चिक : स्थितीत सुधारणा जाणवेल. बचत करू शकाल. खरेदी वेळत करू शकाल. प्रगतीचा आलेख उंचावेल. कार्यक्षमता वाढल्याचे लक्षात येईल. आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
 
धनू : नव्या जबाबदारी पेलाव्या लागतील. निस्वार्थ काम करावे लागेल. कुटूंबात शुभकार्य होतील. प्रवासाचे योग आहेत. खरेदी करू शकाल. 
 
मकर : सुधारणा जाणवतील. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. वैयक्तीक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. वैचारिक सामंजस्य ठेवावे लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरीत विरोधक पाय आडवे टाकतील. चुका सधारण्‍याची संधी मिळेल. 
 
कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. परिश्रमाचे चीज होईल. विशेष संधी प्राप्त होतील. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायात फायदा संभवतो. मित्रमंडळी तसेच कुटुंबातील व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. शुभकार्यांत सहभाग राहील. आर्थिक योग उत्तम राहील. 
 
मीन : कामे पटपट झाल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रगतीचा वेग वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रमंडळींकडून सहकार्य राहील. मनातील इच्छा पूर्ण करू शकाल.