suvichar
✕

साप्ताहिक राशीफल 18 ते 24 जुलै 2021

Updated: शनिवार, 17 जुलै 2021 (21:52 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत काळजी राहील. स्पर्धा परीक्षेत अपेक्षितरीत्या यश मिळणे अवघड स्थितीतच राहू शकेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीचा त्रास राहील. त्यामुळे त्यांना बोट ठेवण्यास जागा रिक्त राहणार नाही. याची विशेष काळजी घेणे उचित ठरेल. काही बाबतीत जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत पारिवारीक सदस्य मंडळीबरोबर मतभेद निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. परिश्रम करूनही यश मिळणे शक्यतेच्या पलीकडेच राहील. मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात संततीबाबत असणार्‍या समस्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळाच्या दृष्टीने होणार्‍या परिणामाचा विचार करावा म्हणजे होणारे नुकसान टळू शकेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात इतरांकडून सहकार्य वेळेवर लाभेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. काही बाबतीत दूर गेलेले यश जवळ येईल. अंतिम चरणात पारिवारीक वातावरण थोडे मानसिक अशांतता निर्माण करणारे राहण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरताच र्मयादित ठेवणे उचित ठरेल. होणारा मनस्ताप टळून उत्साह वाढेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती अस्थिर राहून आर्थिक आवक गरजेनुसार राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील. प्रवासात दगदग व त्रास वाढण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक काळजीपूर्वकच करणे योग्य ठरेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम वतरुळातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. तसेच सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद मिटण्याच्या मार्गी राहील.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत मनावर काळजीचे सावट राहील. मानसिक अशांतता जाणवेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे आवश्यक ठरेल. परिस्थिती अनुकूल व नियंत्रणात राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक आवक सर्वसाधारण राहील. काही प्रमाणात आर्थिक समस्याचा सामना करावा लागेल. इतरांवर अधिक विसंबून राहणे योग्य ठरणार नाही.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. इतरांकडून येणे असलेला पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील. अंतिम चरणात परिस्थिती मनोनुकूल होण्याच्या मार्गावर राहील. मनावर असलेले काळजीचे दडपण कमी होण्याच्या स्थितीत येईल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामाबाबत चांगल्या घडामोडी घडतील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनोनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. परिश्रम व दगदग करावी लागेल. अपेक्षित यश हमाखास मिळू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकुल राहील. त्यामुळे कोणत्याही बाबतीत सहसा अल्प प्रयत्नाने यश मिळणे अवघड राहील. मानसिक दडपण निर्माण करणारी ग्रहस्थिती प्रतिकुल आहे.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सर्व समस्या मिटतील व व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. आर्थिक मदतीचा ओघ इतरांकडून वेळेवर सुरूच राहू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील व मनोनुकूल यश दृष्टिक्षेपात राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील. मानसिक आनंद वाढीस लागेल. अंतिम चरणात नोकरीत अधिकार वाढीसह बदली योग संभवतो. तसेच कला क्षेत्रातील व्यक्तीचा इतरांकडून यथायोग मानसन्मान सोहळा आयोजित केला जाईल. इतरांकडून मनोनुकूल स्वरूपाचे सहकार्य मिळून उत्साह वाढेल.

सर्व पहा

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्वपितृ अमावास्येला ‘या’ १० चुका करू नका, पूर्वजांच्या नाराजीपासून राहा दूर

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments