1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Updated : सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (11:33 IST)

Ank Jyotish 27 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 27 ऑगस्ट

मूलांक 1 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. खर्च जास्त होईल. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. सर्जनशीलता वाढेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आधीपासून सुरू असलेली समस्या दूर होईल. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 3 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आधीची रखडलेली कामे होण्याची शक्यता आहे. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादाचा प्रसंगांपासून दूर राहा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 4 -आजचा दिवस आनंददायी जाईल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. खर्च जास्त होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.
 
मूलांक 5 -.आजचा दिवस आनंदाचा जाईल . उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होईल. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. कामात आणि व्यवसायात भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण जास्त होईल. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. आरोग्य सामान्य राहील. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. खर्च जास्त होईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन  निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीबद्दल मनात अस्वस्थता राहील. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.