गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (23:27 IST)

दैनिक राशीफल 23.04.2022

weekly astro
मेष : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते.  व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील. 
वृषभ : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
मिथुन : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी.  बेर्पवाईने वागु नका.
कर्क : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. 
सिहं : शत्रू प्रभावहीन होतील.  कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. 
कन्या : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. 
तूळ : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. 
वृश्चिक :भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका.
धनू : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल.
मकर : भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील.
कुंभ : सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.
मीन : प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. खाण्या-पिण्यात काळजी घ्या.