Dharma Sangrah
✕

Numerology 30 May 2022 दैनिक अंक ज्योतिष 30.05.2022

Updated: रविवार, 29 मे 2022 (10:51 IST)
 
मूलांक 2 -आपण काही नवीन मित्र बनवू शकाल, ज्याचा तुम्हाला फायदाही होईल. विद्यार्थ्यांच्या यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. संध्याकाळचा वेळ आपल्या संतती सोबत घालवाल. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. लाइफ पार्टनरसाठी शॉपिंग करू शकता.
 
मूलांक 3 - आज तुमच्या जीवनसाथीसोबत तुम्ही मुलाच्या भविष्याशी संबंधित काही योजना आखाल. तुम्ही बचत करण्यासाठी काही चांगल्या योजनेत गुंतवू शकता, जे भविष्यात मुलांसाठी उपयुक्त ठरेल. 
 
मूलांक 4 -राजकारणाशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या नावलौकिकात भर पडेल आणि त्यांचे करिअर उजळेल. वैयक्तिक जीवनात आजचा दिवस खूप व्यस्त असेल.
 
मूलांक 5 -आज तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमात व्यस्त असाल आणि तुमच्या पैशाचा काही भाग धार्मिक कार्यात खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. व्यवसाय करणारे लोक जर कोणाशी पैशाची देवाणघेवाण करत असतील तर ते काळजीपूर्वक करा, कारण आज तुमची फसवणूक होऊ शकते. 
 
मूलांक 6 -जर तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या जीवनसाथीशी सल्लामसलत केली पाहिजे. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या व्यवसायाची कोणतीही योजना सुरू करू शकता. आज तुमच्या आयुष्यात नवीन कोणीतरी येण्याची शक्यता आहे .
 
मूलांक 7 - आजचा दिवस तुमच्यासाठी सावध राहण्याचा असेल, कारण तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्यासाठी पैशाशी संबंधित कोणतीही समस्या देखील उद्भवू शकते, म्हणून आज तुम्हाला फक्त सकारात्मक विचार मनात ठेवावे लागतील. 
 
मूलांक 8 - परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आज जोडीदारासाठी एखादे नवीन व्यवसाय सुरु करण्याचा  विचार करू शकता. कुटुंबात धार्मिक कार्य होण्याचे योग संभवतात. घरात वैवाहिक कार्याची चर्चा सुरू होऊ शकते.
 
मूलांक 9 - आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या व्यस्ततेत असाल आणि इतर कामाकडे लक्ष देण्याचा वेळ मिळणार नाही, ज्यामुळे व्यवसायात अपेक्षित फायदा मिळणार नाही, परंतु दैनंदिन खर्च भागविण्यात यशस्वी व्हाल. 

सर्व पहा

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

अक्षय नवमी २०२६: १८ नोव्हेंबर रोजी करा 'हे' खास उपाय; भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदेल अखंड समृद्धी!

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments