Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 27 फेब्रुवारी ते 5 मार्च 2022

Updated: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (22:01 IST)
 
कर्क : या आठवड्यात तुम्ही मौज मस्ती आणि मनोरंजक प्रारुपांमध्ये अधिक लक्ष्य द्याल. पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील.  
 
सिंह : या वेळेस तुमच्यात जोश आणि उत्साह राहणार आहे. नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल.   
 
कन्या : या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ उतार येण्याची शक्यता आहे. सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. 
 
तूळ : या आठवड्यात व्यवसायी जातकांना कायदे व सरकारी प्रकरणांमुळे त्रास होईल. काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल.  
 
वृश्चिक : वृश्चिक जातक आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक बाबींपेक्षा कौटुंबिक प्रकरणांवर अधिक लक्ष्य देतील. एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल. सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल.  
 
धनू : व्यावसायिकरीत्या तुम्हाला कठिन परिस्थितित पुढे जाणे भाग पडणार आहे. या वेळेस सरकारी अडचणींमुळे कार्य विलंबाने पूर्ण होतील. तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत असे पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल.  
 
मकर : आठवडाचा पहिला दिवस आर्थिक बाबींसाठी अनुकूल आहे.  तसं तर या वेळेस तुम्ही मोठ्या फायद्याची उमेद लावू नका कारण तुम्हाला भाग्याचा साथ मिळणार नाही.  तुमच्या प्रगतीला पूरक असे वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल.  
 
कुंभ : या आठवड्यात आठव्या स्थानात राहू आणि सूर्यासोबत बुध वक्री आहे. यह ग्रहीय स्थिति आपके अनुकूल नहीं है।गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल.   
 
मीन : प्रेम संबंधांसाठी आठवडा फारच अनुकूल आहे कारण पाचव्या स्थानावर प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आहे. तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. 

सर्व पहा

Ganesh Mantra: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी गणपतीचे हे मंत्र जप करा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments