Marathi Biodata Maker
✕

साप्ताहिक राशीफल (3 ते 9 जुलै 2022)

Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (11:30 IST)
 
कर्क - हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा अ- ल तर त्या दृष्टीने हालचाल करावी. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तरुणांनी विवाहाचा निर्णय घाईने घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरची पकड ढिली करू नये.
 
सिंह - सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त मवाळपणाने वागू नये. नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी मूड बाजूला ठेवावेत.
 
कन्या - तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.  
 
तूळ - एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड . सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे.
 
वृश्चिक - काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत.
 
धनू  - तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी . व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये.
 
मकर - तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्याच कामात तुमची धाडसी प्रवृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा.
 
कुंभ - गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे.
 
मीन - अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रिय व्यक्ती आणि मित्रमंडळी खर्चात टाकतील. 

सर्व पहा

आई-वडील, भाऊ-बहीण आणि मित्रांसाठी दिवाळी गिफ्ट्स; बजेटमध्ये १५ उपयोगी आणि वेगळ्या गिफ्ट आयडिया

Dhantrayodashi 2026 धनत्रयोदशीला झाडू, भांडी आणि सोने खरेदी करण्यामागे काय मान्यता आहे?

Ashwini Purnima 2026 आश्विन पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्य पूजन कसे करावे?

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments