शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By

Rahu Gochar 2023 राहुचा या राशींवर होणार परिणाम, उपाय जाणून घ्या

rahukal
Rahu Gochar 2023 : पुढील वर्ष 2023 मध्ये राहूची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू मेष राशीत राहणार असला तरी 2023 मध्ये नक्षत्र नक्कीच बदलेल. सध्या भरणीत गोचर होत आहे. 2023 मध्ये राहूच्या युक्तीमुळे अनेक लोक अडचणीत येतील. तथापि जे लोक येथे सांगण्यात येत असलेले उपाय करतील त्यांच्यावर राहूचा कोणताही परिणाम होणार नाही.
 
छाया ग्रह राहु गोचर प्रभाव | Rahu Ka Rashi Parivartan Effect:
 
1. मेष : तुमच्या राशीतील राहूचे संक्रमण आकस्मिक घटना आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहे. मान- अपमान यापासून वाचावे लागेल. याशिवाय येथे स्थित राहु रोग आणि दुःख देतो. ते तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उलथापालथ निर्माण करेल. आपण सावध असणे आवश्यक आहे. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. निरर्थक वादविवादांपासून दूर राहा.
 
2. वृषभ : राहु तुमच्या राशीत 12 व्या भावात गोचर करेल म्हणून खर्च वाढतील आणि आरोग्य गडबडू शकतं. जर तुम्ही परदेशाशी संबंधित कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल, नुकसान होऊ शकते. नोकरी करत असाल तर वादविवादापासून दूर राहा.
 
3. सिंह : राहू तुमच्या नवव्या घरात स्थित आहे. या काळात कुटुंबात मतभेद होऊ शकतात. प्रवासात जास्त खर्च येईल. नशीब साथ देणार नाही. नोकरी-व्यवसायात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि अधिक संघर्ष करावा लागू शकतो.
 
4. कन्या : राहु तुमच्या आठव्या भावात प्रवेश करत आहे. या काळात गूढ रहस्यांमध्ये तुमची आवड वाढू शकते. नोकरी-व्यवसायात मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा काळ तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला आहे.
 
5. मकर : तुमच्या राशीच्या चौथ्या घरात राहुचे गोचर संघर्षाला चालना देणारे आहे. करिअर, नोकरी, स्थावर मालमत्ता आणि आईच्या आरोग्यासाठी हा काळ चांगला नाही. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला नोकरी आणि मालमत्तेसह इतर बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागेल.
 
6. मीन : राहू तुमच्या दुसऱ्या भावात भ्रमण करत आहे. या काळात तुम्हाला अचानक काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. कुटुंबातील कोणाशी तरी संबंध बिघडू शकतात. घसा आणि दातांमध्ये समस्या असू शकतात. आपण सतर्क राहणे आवश्यक आहे.

राहु पासून वाचण्याचे उपाय- How to reduce malefic effects of Rahu
 
1. गुरुचे उपाय करावे म्हणजे केशराचे तिलक लावावे. मंदिरात पिवळ्या वस्तूंचे दान करावे आणि गुरुवारी उपास करावा.
 
2. तामसिक भोजन आणि मदिरापान टाळा.
 
4. हनुमान चालीसाचा पाठ करत राहा.
 
5. वाणी आणि क्रोध यावर ताबा ठेवा. कोणाबद्दल वाईट बोलू नका तसेच कोणाचेही नुकसान करू नका.
 
6. तुमचे विचार आणि योजना गुप्त ठेवा.
 
7. डोक्यावर जखम असू देऊ नका.
 
8. सासरच्या मंडळींशी चांगले संबंध ठेवा.
 
डिस्क्लेमर : ही माहिती ज्योतिषशास्त्रीय विश्वास, गोचरची प्रचलित धारणा इत्यादींवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. वाचकांनी ज्योतिषशास्त्रातील तज्ञाचा 
 
सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.