सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (19:15 IST)

Weekly astro साप्ताहिक राशीफल 25 ते 31 डिसेंबर 2023

weekly rashifal
मेष : वर्षाचा शेवटचा आठवडा आनंददायी आणि मनोरंजक जाणार आहे. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. काहीतरी चांगली बातमी मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षा होती. आर्थिक लाभ प्रचंड होणार आहेत. आठवड्याचे पहिले तीन दिवस विशेष लाभाचे ठरतील. वैवाहिक जीवनात काही वाद निर्माण होऊ शकतात. महत्त्व आणि आदर न मिळाल्याने तुम्ही नाराज राहू शकता. तुमच्या जोडीदाराचा कल दुसऱ्या दिशेने असू शकतो.
 
वृषभ :  प्रेम आणि वैवाहिक संबंध चांगले राहणार आहे. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होईल आणि लोकांच्या आयुष्यात प्रेम फुलेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. भौतिक सुखसोयी वाढणार आहेत. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या सहलीला जाण्याची संधी मिळेल. नोकरदारांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यवसायात नवीन करार कराल. जुनी कामे लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
 
मिथुन : आरोग्याच्या दृष्टीने  सावध राहावे लागेल. आर्थिक लाभासाठी हा काळ चांगला राहील. कर्जमुक्तीची परिस्थिती निर्माण होणार आहे. मालमत्तेचे वाद मिटतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सहली होतील. प्रेमसंबंधांचे रुपांतर लग्नात होण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.
 
कर्क : वर्षाचा हा शेवटचा आठवडा या राशीच्या जातकांच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. तुमचे काम सहज पूर्ण होईल. संकट कमी होईल. वाद मिटवण्यात यश मिळेल. आर्थिक तंगी गेल्याने तुम्ही कौटुंबिक गरजांवर खर्च करू शकाल. नोकरीतील बदलामुळे बदली होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळेल. अधिकारी आणि नेते यांच्याशी संबंध दृढ होतील. व्यापारी वर्ग आनंदी राहील.
 
सिंह : सर्व प्रलंबित कामे या आठवड्यात लवकर पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे. ज्या जोडप्यांमध्ये मतभेद आहेत त्यांनी परस्पर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, त्यांना यश मिळेल. या आठवड्यात तुमची राज्यशक्ती मजबूत राहिल्यास, तुम्हाला सन्मान आणि स्थान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी या आठवड्यात प्रयत्न करावेत, त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
कन्या : परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील. 
 
तूळ : मन सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असेल. आर्थिक लाभ होईल. विलासी जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल कराल. वैवाहिक जीवन मधुर होईल. अविवाहितांच्या लग्नाची चर्चा होईल. नोकरीत प्रगतीसाठी प्रयत्न करा आणि यश मिळेल. नवीन व्यावसायिक करारांवर स्वाक्षरी करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला अधिक उंचीवर नेऊ शकाल.
 
वृश्चिक : करिअरबद्दल बोलायचे झाले तर कोणतीही अडचण येणार नाही. तरुणांना परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळणार आहेत. पैसा येईल आणि तुम्ही तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च कराल. जर तुम्ही स्वतःसाठी इमारत किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात प्रयत्न करा, फायदा होईल. तब्येत सुधारेल. आजारांवर होणारा खर्च कमी होईल.
 
धनु : सर्व कामे सहज पूर्ण होतील. भौतिक सुखांमध्ये वाढ होणार आहे. अडकलेला पैसा परत येईल. मालमत्ता आणि शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला राहील.भौतिक सुखांमध्ये वाढ होणार आहे. अडकलेला पैसा परत येईल. मालमत्ता आणि शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला राहील.अविवाहितांच्या लग्नाची चर्चा होईल. करिअरमध्ये वाढ होईल, विशेषत: सरकारी नोकरीत बढती. नवीन काम सुरू करण्यासाठी आठवडा चांगला राहील.
 
मकर : वैवाहिक जीवनात मतभेद असू शकतात. तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन यशस्वी होऊ शकते परंतु विचारपूर्वक आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील संबंध सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्य चांगले   राहील.
 
कुंभ : शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक कामांसाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. तुम्हाला आर्थिक विवंचना जाणवेल आणि काही कामं अडकून राहतील. मात्र, आठवड्याचे शेवटचे दोन दिवस चांगली बातमी घेऊन येतील.आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात सकारात्मक बदल घडून येतील. 
 
मीन : हा शेवटचा आठवडा कौटुंबिक सहकार्य मिळेल. मित्रांसोबत मनोरंजक सहली होतील. तब्येतही सुधारेल. तुटलेले प्रेम संबंध पुन्हा एकदा नवीन उर्जेने भरले जातील. तुमचा प्रेम प्रस्ताव स्वीकारला जाईल.नोकरीत मोठे बदल होतील. वीन आणि मोठी जबाबदारी मिळेल. पद आणि पैसा वाढेल. व्यवसायात लाभ होईल. नवीन स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवाल.मोठे आर्थिक लाभ होणार आहेत. नवीन वाहन खरेदीचे योग येतील.