Daily Horoscope
✕

Weekly Horoscope साप्ताहिक राशीफल 12 ते 18 मार्च 2023

Updated: शनिवार, 11 मार्च 2023 (15:02 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरीवगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू 
शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.  
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरीत्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. अंतिम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील. 

सर्व पहा

Who is Kuber कुबेर देव कसे बनले धनाचे देवता? जाणून घ्या पुराणातील रंजक कथा!

Vasubaras Aarti वसु बारस या सणाच्या निमित्ताने करा कामधेनुची आरती

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

वसुबारस पूजनात या गोष्टी नक्की ठेवा; जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments