बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Updated : बुधवार, 7 डिसेंबर 2022 (11:43 IST)

वृश्चिक राशिभविष्य 2023 Scorpio Bhavishyafal 2023

या राशीच्या जातकांना लोक साधारणपणे एक अशी व्यक्ती म्हणून ओळखतात ज्याची स्वतःची समज आणि स्वतःचे विचार आहेत. परंतु नवीन वर्ष 2023 मध्ये, ग्रहांची उलाढाल तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार बदलण्यासाठी भाग पडू शकते . विशेषतः, वैयक्तिक जीवनात, आपण आपल्या जोडीदारासह असे अनुभवू शकता. हे बदल चांगले आणि नवीन असतील. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे मदत मिळेल.
 
वृश्चिक राशीचे लोक वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक लाभाच्या संधींची अपेक्षा करू शकतात. हा कालावधी शुक्राच्या अस्त होण्या पर्यंत राहील. अशा परिस्थितीत, तुम्हाला या वेळेचा चांगला उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय 2023 हे वर्ष या राशीच्या जातकांच्या आयुष्यात काही बदल घडवून आणणार आहे, ज्यांना या वर्षी लग्न करायचे आहे. जर कोणी आधीच विवाहित असेल तर त्याच्या आयुष्यात अनुकूल बदल देखील घडू शकते. जोडीदाराबद्दल तुमचा आदर आणखी वाढेल. आरोग्याची काळजी विशेषत: नवीन वर्ष 2023 च्या शेवटच्या तिमाहीत, तुम्हाला  अधिक घ्यावी लागेल.
 
* वृश्चिक प्रेम जीवन 2023 Scorpio Love Horoscope 2023 -
तुम्ही कितीही व्यवहारिक असाल, पण प्रेमाच्या नात्यात तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तसे, हे वर्ष तुमच्यासाठी प्रेम आणि रोमान्सने परिपूर्ण असेल. नुकतेच नात्यात गुंतलेल्या या राशीच्या जातकांना वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गुरु ग्रहाचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे या राशीच्या जातकांना त्यांच्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. पण प्रत्येकाच्या प्रेम जीवनात सर्व काही चांगलंच असलं पाहिजे असं नाही.
 
 ज्या लोकांचे कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू आहे, त्यांना पूर्वार्धाच्या शेवटी यश मिळेल. वृश्चिक प्रेम राशिभविष्य 2023 नुसार, या वर्षी तुमच्या स्वतःच्या विचारांबद्दल  मनात मतभेद असतील, ज्यामुळे तुम्हाला एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी संबंधित निर्णय घेण्यात अडचण येईल. म्हणूनच या राशीच्या जातकांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःवर इतका दबाव आणू नये की त्यांना ओझे वाटू लागते.
 
वृश्चिक राशीचे जे लोक अजूनही अविवाहित आहेत, त्यांनी या वर्षी इतरांशी संवाद साधताना थोडे सावध राहणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीसाठी 2023 प्रेम जीवन भविष्य सांगते की इतरांशी संवाद साधण्यात तुम्हाला अस्वस्थता जाणवेल.परिणामी, तुम्हाला असे वाटेल की स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधणे हे खूप कठीण काम आहे. या राशीच्या जातकांना शांत आणि आशावादी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे .2023 च्या चौथ्या तिमाहीत लग्नाचे प्रस्ताव मिळतील तसेच इतरांशी संवाद साधण्याचे कौशल्य देखील सुधारेल.
 
वृश्चिक राशीच्या जातकांच्या प्रेम जीवनासाठी राशीच्या भविष्यानुसार काही जोडपे त्यांच्या नात्याला पुढे नेतील. कामकाजाच्या जीवनात तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे सहकारी कठीण काळात सहकार्य करून ,योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. जेणे करून तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने पुढे वाटचाल कराल. यामुळे तुमचे नाते अधिक चांगले आणि दृढ होतील.
 
* वृश्चिक आर्थिक स्थिती 2023 Scorpio Finance Horoscope 2023 -
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 2023 हे वर्ष खूप भाग्यशाली असणार आहे. या वर्षी शनी महाराज या राशीच्या जातकांची परीक्षा घेणार आहे.या राशीच्या जातकांनी   प्रत्येक गोष्ट नवीन आणि वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करा.शनी महाराज, आपली आर्थिक स्थिती थोडी सुधारण्यास मदत करेल. या वर्षी आर्थिक क्षेत्रात अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्याचे फायदेही मिळू शकतात.
 
या राशीचे जातक आपल्या संपत्तीचा जितका जास्त विचार कराल, तेवढी त्यांना  काळजी वाटेल. गुंतवणूक कशी करावी,काय करू नये असे प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उद्भवतील. पण त्याबद्दल जास्त काळजी करू नये, वर्ष सरता सरता या राशीच्या जातकांना संपत्ती जमवणे आणि त्याचा योग्य वापर करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकाल . 2023 मध्ये तुम्हाला अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे आनंदी राहा आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा.
 
*वृश्चिक करिअर 2023  Scorpio Career Horoscope 2023 -
 
या राशीच्या जातकांनी गुंतवणूक करण्याचा विचार या वर्षी 2023 च्या उत्तरार्धात करावा. कारण या काळात ग्रहांच्या बदलांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या गमावलेल्या मालमत्तेतून कमाई करण्यासाठी दीर्घकाळ परिश्रम घेतलेल्या या राशीच्या जातकांना या वर्षी त्याचे फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्याला पैसे उधार दिले असल्यास उधारी उसनवारी  दुसऱ्या सहामाहीत परत मिळेल. 
 
या राशीच्या जातकांनी उत्पन्नात झालेली वाढ पाहून अति उत्साह करू नये. लक्षात ठेवा की 2023 हे वर्ष या राशींच्या जातकांसाठी काही आव्हाने आणि संकेत घेऊन येणार आहे. म्हणूनच भावनेत येऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. वर्षाच्या मध्यात या राशींच्या जातकांसाठी आर्थिक समस्या उद्भवतील . हा काळ या राशींच्या जातकांसाठी खूप कठीण असू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. 
 
* वृश्चिक करिअर 2023  Scorpio Career Horoscope 2023 -
या राशीचे जातक प्रेम जीवनात आलेल्या कोणत्याही प्रकारची समस्या व्यवस्थितपणे हाताळतात .याचा अर्थ असा आहे की या राशीच्या जातकांना नात्यात आलेल्या समस्यांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.पण या राशीच्या जातकांना करिअरमध्ये उदभवणाऱ्या समस्यांना समजून न घेतल्यामुळे व्यवस्थित हाताळता येत नाही. म्हणूनच वृश्चिक राशीची करिअर कुंडली 2023 च्या भविष्यानुसारया राशीच्या जातकांना करिअरमध्ये समस्या आल्यावर लगेच विचलित न होण्याचा सल्ला देत आहे. नोकरी करणार्‍या पुरुष आणि महिलांना जातकांना  कार्यालयात त्यांचे ध्येय साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात.या राशीच्या जातकांना त्यांचा कमकुवतपणा आणि चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतील.त्यानंतर आपल्या कार्यामध्ये प्रगती करावी लागणार. 
 
वृश्चिक राशीचे जातक जे नौकरी मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करत आहे त्यांना शनि ग्रहामुळे यश मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा फ्रीलान्सिंगद्वारे आपले करिअर सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. राहू आणि केतू हे ग्रह या राशीच्या जातकांच्या पत्रिकेत एकत्र असल्यामुळे या जातकांच्या  कामकाजाच्या जीवनावर परिणाम होईल, परंतु विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात पूर्ण लक्ष देऊ शकणार नाहीत. यासोबतच तुम्हाला स्वतःमध्ये उर्जेची कमतरता जाणवेल.
 
 वृश्चिक करिअर राशी भविष्य 2023 नुसार की तिसऱ्या तिमाहीत या राशीच्या जातकांना अधिक यश मिळेल. व्यवसायात सावधगिरीने पाऊले उचलण्याचा सल्ला दिला जात आहे , भागीदारांसोबत पूर्ण सावधगिरीने पाऊले वाढवा. कार्याची गुपिते भागीदारांसमोर उघडणे टाळा. राशिभविष्यानुसार या राशीच्या जातकांची व्यवसायातील भागीदाराकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
 
लहान व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करत असणाऱ्या जातकांना त्यांच्या पालक आणि इतरांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.घाई घाईने निर्णय घेऊ नका व्यवसायात नुकसान संभवते. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा
.
* वृश्चिक कौटुंबिक स्थिती 2023 Scorpio Family Life Horoscope 2023 -
या राशीच्या लोकांची विचार सारणी तुमच्या कुटुंबातील लोकांशी जुळत नसल्यामुळे. वर्ष 2023 च्या सुरुवातीपासून, या राशींच्या जातकांशी कुटुंबासोबत मतभेद होतील. तुमचे करिअर क्षेत्रही मतभेदाचे कारण असू शकते.या राशींच्या जातकांनी शक्य तितका राग कमी करा. 2023 च्या भविष्यानुसार, या राशींच्या जातकांसाठी दुसऱ्या तिमाहीत अधिक चांगल्या गोष्टी  होऊ लागतील.
 
वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढत्या कलहामुळे या राशीचे जातक अस्वस्थ होऊ शकतात आणि 'हॅपी फॅमिली' सारख्या गोष्टींवरील विश्वास गमावू शकता. पण कालांतराने परिस्थिती नक्कीच सुधारेल. घरात बदल घडतील. यामुळे घरात काहीकाळ अशांततेचे वातावरण असू शकते. गुरू आणि शनीमहाराजांच्या आशीर्वादाने या राशीचे जातक सर्व समस्यांना कोणत्याही अडचणीशिवाय सामोरे जातील .
 
या राशीच्या जातकांच्या वृद्धांच्या आरोग्याच्या काही समस्या असू शकतात. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल सावध आणि सावधगिरी बाळगा. इतरांची काळजी घेण्यासोबतच स्वतःचीही काळजी घ्या. घरातील मुलांचा प्रश्न आहे, 2023 कुंडली सांगते की त्यांचे आरोग्य चांगले राहील. ते त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील.
 
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नवीन वर्ष 2023 मध्ये अनेक आनंदाचे क्षण असतील. या राशीचे जातक स्वतःच्या मनाचे ऐकून आयुष्यातील समस्या सहज सोडवाल. या सवयीमुळे घरात सकारात्मक बदल होतील. चांगली गोष्ट अशी आहे की शुक्र ग्रह या राशींच्या जातकांची कुटुंबासोबत चांगली भागीदारी तयार करण्यात मदत करेल.
 
* वृश्चिक आरोग्य 2023 Scorpio Health Horoscope 2023 -
वृश्चिक आरोग्य राशी भविष्य 2023 नुसार, या राशीच्या जातकांना चांगले वाटेल, कारण त्यांचे मागील वर्षातील आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या दूर होतील. मंगळाचा प्रतिगामी कालखंड संपल्यानंतर या राशीच्या जातकांच्या तब्येतीत बदल जाणवू लागतील. म्हणूनच वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. या राशीचे जातक कोणत्याही मानसिक समस्या किंवा निद्रानाशाच्या समस्येशी झुंजत असाल तर हे वर्ष या राशीच्या जातकांना काही संकेत देत आहे. शनि ग्रह या राशीच्या जातकांना जीवनशैली बदलण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीमध्ये सुधारण्यासाठी  सुरुवातीपासूनच सतर्क करत आहे.
 
ज्यां जातकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा जातकांना स्वतःमध्ये ऊर्जेची कमतरता जाणवू शकते.जातकांनी आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचे नकारात्मक परिणाम जीवनातील इतर पैलू जसे की करिअर इत्यादींवर दिसू लागतील. वृश्चिक राशी भविष्य 2023 नुसार या राशीच्या जातकांना मधुमेह, गॅस्ट्रिक किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरी जावे लागू शकते.
असे असूनही, या राशीच्या जातकांना आहाराच्या सवयी सुधारण्याची गरज आहे. यासोबतच योगासनाला तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवा जेणेकरून ते निरोगी राहू शकतील.
 
वृश्चिक राशीच्या महिला जातक गर्भवती असल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहतील. परंतु ज्या मुलांना फ्लू किंवा विषाणूजन्य आजार असल्यास त्यांची अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते. घरातील ज्येष्ठ सदस्यांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे. ज्यां जातकांनी वजन कमी करण्याचा किंवा शरीर सुदृढ ठेवण्याचा संकल्प केला होता, त्यांच्यासाठी परिस्थिती थोडी गंभीर होईल, कारण ते त्यांचा संकल्प पूर्ण करण्यात अपयशी ठरतील. तथापि, इतर ग्रह या राशींच्या जातकांना पूर्ण सहकार्य करतील आणि हार न मानण्यास प्रवृत्त करतील.
 
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की 2023 मध्ये जर तुम्ही आपल्या सभोवताली गोष्टींबद्दल जास्त काळजी करत असाल तर या राशींच्या जातकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी ग्रह जबाबदार असू शकतात. चंद्रामुळे या राशीचे जातक अस्वस्थ होऊ शकतात आणि वेळोवेळी काही आरोग्याच्या समस्या जातकां समोरउदभवू शकतात. दुसरीकडे, बृहस्पति या राशीच्या जातकांना  सतत हालचाल करत राहण्यासाठी आणि कोणताही रोग टाळण्यास प्रवृत्त करेल.
 
* वृश्चिक विवाह राशिभविष्य 2023  Scorpio Marriage Horoscope 2023 -
सामान्यतः लोकांना त्यांच्या आयुष्यातील एकटेपणा किंवा शून्यता दूर करण्यासाठी जीवनसाथी हवा असतो. पण या राशीच्या जातकांची इच्छा पूर्णपणे वेगळी असते. या राशीच्या आयुष्यात जीवनसाथी केवळ आधारासाठीच नाही तर त्याने/तिने तुम्हाला वेळोवेळी सूचना द्याव्यात अशी इच्छा असते.जातक या बाबतीत खूप भाग्यवान सिद्ध होतील. असा जीवनसाथी शोधत आहात तो या राशीच्या जातकांना नक्कीच मिळेल. दीर्घ काळा बद्दल बोलत असताना, या वर्षाच्या शेवटी या राशीच्या जातकाचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे.
 
ज्या जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, ज्या जातकांना  विवाहासंबंधी कायदेशीर खटल्याचा सामना करावा लागत आहे, या वर्षी त्यांच्या बाजूने निर्णय लागतील. ज्या विवाहित जोडप्यांना गेल्या वर्षभरापासून काही समस्यांचा सामना करावा लागत आहे, या वर्षी त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. ज्यां जातकाचे  कुटुंब आणि सासरच्या लोकांशी चांगले संबंध नाहीत, त्यांची परिस्थिती देखील 2023 च्या शेवटच्या तिमाहीत सुधारेल.
 
या राशीच्या जातकाचे लग्न  होत नसल्यास या वर्षी त्यांना आनंदाची बातमी मिळेल. या राशीच्या जातकांसाठी वर्ष 2023 नुसार  लग्नाचे प्रस्ताव मिळतील. ज्या कुटुंबाशी नातं जुळणार आहे त्यांची माहिती मिळवून घ्या. सुरुवातीला त्यांच्याशी जुळवून घेणे या राशीच्या जातकांसाठी असहज वाटू शकते.
 
वृश्चिक राशीच्या काही जातकांच्या घरी लहान बाळांचे आगमन होईल, ज्यामुळे घरातील आनंद वाढेल. घरात नवीन पाहुणे आल्याने पती-पत्नीमधील संबंधही सुधारतील आणि घरातील वातावरणही प्रसन्न आणि शांत होईल. एवढेच नाही तर वृश्चिक राशी भविष्य 2023 नुसार या राशीचे जातक सामाजिक समारंभाचा आनंद घेतील , या राशीच्या जातकाचे संबंध जोडीदाराशी आणखी घट्ट होतील.
 
* 2023 मध्ये वृश्चिक राशीसाठी ज्योतिषीय उपाय  -Astrological remedies for  Scorpio in 2023 -
 
वृश्चिक राशीसाठी ज्योतिषांनी दिलेल्या काही उपयुक्त आणि प्रभावी टिप्स खाली दिल्या आहेत, ज्यांचे पालन करून ते 2023 मध्ये यश मिळवू शकतात. यासह, आपण जीवनाच्या प्रवासातील अडथळे आणि कठीण परिस्थिती दूर करू शकता:
 
* संपूर्ण दिवसभर कमी शिजलेले अन्न खाणे टाळावे.
* विशिष्ट परिस्थितीत या राशीचे जातक उत्साही होऊ शकता.आपल्या भावना आणि स्वभावावर नियंत्रण ठेवावे.
* या राशीच्या जातकांनीं सोमवारी किंवा दररोज भगवान कालभैरवाची पूजा करावी.
* या राशीच्या जातकांनी आपल्या पूर्वजांची नियमितपणे किंवा आठवड्यातून एकदा प्रार्थना करावी.
* या राशीच्या जातकांनी दररोज मंदिरात जावे किंवा वर्षातून एकदा तीर्थक्षेत्राला भेट द्यावी.
* कामात जास्त गुंतणे टाळा, कारण यामुळे आरोग्य बिघडू शकते. जर तुम्हाला जीवित आणि मालमत्तेची हानी नको असेल तर कामातून वेळोवेळी ब्रेक घ्या.
* पुढील मार्गातील अडथळे टाळण्यासाठी शनि यंत्राची पूजा करा.
 
 
Edited By - Priya Dixit