गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By

मूलांक 6 साठी वर्ष 2024 कसे राहील

numerology 2024 mulank 6
Annual Horoscope 2024 of Radix Mulank 6 : अंकशास्त्रानुसार वर्ष 2024 ची बेरीज 8 होत आहे जी शनीची संख्या आहे. यात चंद्राचा क्रमांक 2 आणि राहूचा 4 आहे. त्यामुळे हे वर्ष शनिमुळे स्थिरतेचे वर्ष मानले जात असतानाच चंद्र आणि राहूमुळे हे वर्ष चढ-उताराचे वर्ष असल्याचे बोलले जात आहे. जर तुमची मूलांक संख्या 6 असेल तर ती राहूची संख्या आहे. 2024 वर्षाचे अंदाज जाणून घ्या.
 
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 या तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 5 आहे)
 
भविष्यफल : जन्मतारीख 6 अससल्यास शुक्र, 15 असल्यास शुक्रासह सूर्य आणि बुध आणि 24 असल्यास शुक्रासह चंद्र आणि राहूचा प्रभाव राहील. जन्म दिनांक 6 असल्यास वर्ष चांगलं जाईल, 15 असल्यास खूप छान आणि 24 असल्यास वर्ष संमिश्र राहील.
 
शिक्षण : हे वर्ष विद्यार्थ्यांना खूप चांगले निकाल देऊ शकते. भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले तर यश मिळेल. परंतु तुम्ही निष्काळजी राहिल्यास, अपेक्षित परिणाम मिळविण्यात तुम्ही मागे पडू शकता.
 
नोकरी : नोकरीसाठी हे वर्ष चांगले राहील. पदोन्नती तसेच इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे. कमिशन किंवा फील्ड कामात फायदा होईल. जर तुम्ही फॅशन, थिएटर अॅक्टिंग, इंटीरियर डिझायनिंगमध्ये काम करत असाल तर वर्ष चांगले जाईल.
 
व्यवासाय : व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्वेलरी, सलून, मेक-अप आर्टिस्ट, फिटनेस एक्सपर्ट, इंटिरियर डिझायनिंग इत्यादी लक्झरी सेवांशी संबंधित कामात गुंतले असाल तर तुम्हाला प्रचंड नफा मिळेल.
 
रिलेशनशिप : प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष चांगले असेल, परंतु वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे असेल. नात्यात काही वाद चालू असतील तर ते मिटतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर वर्षभरात लग्न होण्याचे योग आहे.
 
आरोग्य : डोळ्यांशी संबंधित समस्या, पचनाचे आजार, सांधेदुखी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
 
विशेष अंक : वर्ष 2024 मध्ये तुमच्यावर विशेष रुपाने 6, 5, 8, 1, 2 आणि 4  अंकांचा विशेष प्रभाव राहील.
शुभ दिन : शुक्रवार, सोमवार आणि बुधवार
शुभ रंग : पांढरा आणि निळा
रत्न : हिरा किंवा हिर्‍याचे उपरत्न