Marathi Biodata Maker
✕

मूलांक 3 साठी वर्ष 2024 कसे राहील

Updated: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (12:45 IST)
 
मूलांक 3
(तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला असेल तर तुमचा क्रमांक 3 आहे.)
 
भविष्य : जन्म तारीख 3 किंवा 30 आहे तर बृहस्पति, 12 आहे तर बृहस्पतिसह सूर्य आणि चंद्र, 21 आहे तर बृहस्पतिसह सूर्य आणि चंद्राचा देखील प्रभाव पडेल. 3 तारीख असणार्‍यांसाठी काळ चांगला आहे. 12 आणि 21 जन्मतारीख असल्यास काळ संमिश्र राहील.
 
शिक्षण : बृहस्पतिच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांना यश मिळेल. तरीही जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत अव्वल होऊ शकता. उच्च शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात विशेष अभ्यास करणे फायदेशीर ठरू शकते. नवीन गोष्टी शिकण्यात आणि संशोधन करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
 
नोकरी : या वर्षी तुम्ही तुमच्या कामात चांगली कामगिरी करताना दिसतील. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. बृहस्पति सोबतच तुम्हाला चंद्राची साथ मिळेल, त्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. तथापि हे वर्ष संशोधक, शिक्षक, प्रेरक वक्ते, अध्यात्मिक गुरू इत्यादींसाठी चांगले राहील.
 
व्यवसाय : व्यावसायिक लोक आर्थिक बाबतीत चांगले काम करू शकतात. या वर्षी तुम्हाला गुंतवणुकीचे काही नवीन मार्ग देखील मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात लाभ होईल.
 
रिलेशनशिप : तुमची प्रेमसंबंधित बाब असो किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणतीही बाब असो, तुम्हाला दोन्हीमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. समस्या समजून घेऊन सोडवता येतील. वाणीवर संयम ठेवल्याने कुटुंबात प्रेम वाढेल. नवीन वाहन खरेदी करू शकता.
 
आरोग्य : यावर्षी आरोग्यात सुधार होईल. नियमाने व्यायाम किंवा योगासन करा.
 
विशेष अंक : वर्ष 2024 मध्ये तुमच्यावर 2, 8 आणि 4 अंकांचा विशेष प्रभाव राहील.
शुभ दिन : गुरुवार आपल्यासाठी शुभ दिन आहे.
शुभ रंग : नारंगी आणि पिवळा रंग शुभ ठरेल.
रत्न : पुखराज.

सर्व पहा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

लक्ष्मी पूजन आरती

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

दिवाळी लक्ष्मीपूजन आरती

Diwali Upay 2026: दिवाळीच्या रात्री गुपचुप या ठिकाणी ही एक वस्तू ठेवा... रातोरात तुमचे नशीब बदलेल!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments