Festival Posters
✕

साप्ताहिक राशीफल 09 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024

Updated: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (18:35 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगल्या स्वरूपाचा लाभ घडेल व नवीन भागीदारी प्रस्ताव समोर येईल. तो जरूर जरूर स्वीकार करावा, लाभप्रद ठरेल. अपेक्षित घडामोडी व घटना घडून येतील व यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे भावी काळाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकेल. योग्य ती काळजी घेणे चांगले.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळू शकेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व यशस्वितेकडे वाटचाल राहू शकेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील व काळजीचे सावट दूर होऊ शकेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल व संततीबाबत आनंद वार्ता हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहील व वेळेवर सहकार्य मिळून उत्साह वाढेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक समस्या मिटतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक शांतता व समाधान टिकून राहील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. परंतु कौटुंबिक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग आवश्यक ते सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. स्थगित व्यवहार सुरळीतपणाच्या मार्गी लागतील व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील. क्रीडा क्षेत्र बक्षीसपात्र स्थितीतच राहील व मनावरील काळजीचे सावट दूर होऊ शकेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील.आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे उचित ठरेल. अंतिम चरणात पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी ठरेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक शांतता प्रस्थापित स्वरूपातच राहून यश मिळेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळू शकेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता काही प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त एकणेपुरतेच र्मयादित ठेवणे उचित ठरेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल व भावी काळात होणार मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देईल व काही प्रमाणात काळजी व समस्या मिटेल. मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत येतील. स्थगित व अपूर्ण योजना गतीने पूर्ण होतील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक सुख-शांती व समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक ठरेल. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. त्यामुळे होणारे नुकसान टळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Vasubaras वसुबारस २०२६: सवत्स गाईच्या पूजनाचे महत्त्व, कथा आणि शुभ मुहूर्त

Happy Vasu Baras 2026 Images वसुबारस निमित्त शुभेच्छा इमेजेस मराठी

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

चंद्राची आरती; जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments