deepawali
✕

साप्ताहिक राशीफल 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर 2024

Updated: रविवार, 29 सप्टेंबर 2024 (09:20 IST)
 
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण होत आहे. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.  
 
सिंह : जूनी येणी वसूल होतील. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी येतील.  
 
कन्या : परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील. 
 
तूळ : आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त प्रवास घडून येतील. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील.  
 
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल.  
 
धनु : नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील.  
 
मकर : बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.  
 
कुंभ : कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. लेखकांच्या हातून टिकात्मक लिखाण होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश मिळेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले अंदाड अचूक ठरतील.  
 
मीन : प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. भावाबहिणींसंबंधात ताण तणाव वाढतील. मन सुन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महत्वाचे कागदोपत्रीचे व्यवहार मनोजोगे होतील. मनस्वास्थ लाभेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

वसुबारस पूजनात या गोष्टी नक्की ठेवा; जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजनाला दाखवा 'या' खास गोष्टींचा नैवेद्य

वसुबारस २०२६: या पवित्र दिवशी चुकूनही करू नका 'या' ८ चुका!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments