Festival Posters
✕

Ank Jyotish 18 October 2025 दैनिक अंक राशिफल

Updated: शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 (16:02 IST)
 
मूलांक 4 - आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून आर्थिक लाभ होईल, परंतु घाईघाईने घेतलेल्या आर्थिक निर्णयांमुळे धनहानी देखील होऊ शकते. वरिष्ठांच्या सहकार्याने प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक समस्यांपासून आराम मिळेल आणि जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
 
मूलांक 5 -  आजचा दिवस सामान्य जाईल. कामाच्या ठिकाणी शांत मनाने निर्णय घ्या. भावनेने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. वाहन जपून चालवा. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्यावर नकारात्मकता हावी होऊ देऊ नका. आज जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि इतरांचे मन दुखावणारे शब्द वापरू नका.
 
मूलांक 6 -आजचा दिवस खूप व्यस्त असेल. ऑफिसमध्ये कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. त्यामुळे थोडा तणाव जाणवू शकतो. मात्र, यामुळे नोकरीत बढतीची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. आज प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
 
मूलांक 7 आजचा दिवस ऊर्जेची आणि उत्साहाची कमतरता भासणार नाही. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामांचे कौतुक होईल. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळेल. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. वाद घालणे टाळा. सकारात्मक राहा आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कार्यालयात कामातील आव्हाने वाढतील. शत्रू सक्रिय दिसतील. त्यामुळे त्रास वाढू शकतो. तथापि, आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. वाद घालणे टाळा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाचा जास्त ताण घेऊ नका. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळतील, परंतु अतिरिक्त खर्च देखील होतील.
 
मूलांक 9 - आजचा दिवस सामान्य असेल. मित्रांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तब्येत सुधारेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील.आज खर्च आज वाढू शकतो. त्यामुळे घाईगडबडीत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. नवीन कामे सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत नगाजी महाराज

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

श्री पंत महाराज बाळेकुंद्री: अलौकिक जीवनचरित्र, सिद्धी आणि अवधूत संप्रदायाचे अधिष्ठान

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments