Ank Jyotish 25 February 2025 दैनिक अंक राशिफल  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  मूलांक 1 -आजचा दिवस शुभ असणार आहे.आज गुंतवणूक केली तर भविष्यात लाभ मिळू शकतो. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कार्यक्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. मात्र, आज शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे.
				  													
						
																							
									  
	 
	मूलांक 2 -. आज कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायातील प्रश्न हळूहळू सुटतील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो.
				  				  
	 
	मूलांक 3  आज  कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. अध्यात्म आणि संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळेल. पैशाची आवक वाढेल. मात्र, जास्तीचा खर्च मनाला त्रास देऊ शकतो.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	मूलांक 4 - आजचा दिवस शुभ आहे. तुमची अनेक प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात.  आत्मविश्वास वाढेल. लव्ह लाईफ सुधारेल. आज उत्साह आणि पूर्णता जाणवेल. कार्यालयातील वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. पैशाशी संबंधित कामे होतील.
				  																								
											
									  
	 
	मूलांक 5 - आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. कोणताही वाद टाळण्याचा प्रयत्न करा अन्यथा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज प्रियकराची भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.
				  																	
									  
	 
	मूलांक 6 -आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये दिलासा मिळू शकेल. काही नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकता. भाऊ-बहिणीमध्ये मतभेद होऊ शकतात. नातेवाईकांशी मतभेदही होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा
				  																	
									  
	. .
	मूलांक 7 आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबासोबत कुठेतरी फिरू शकता. आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय चांगला राहील. नोकरीत प्रगती होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.  मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
				  																	
									  
	 
	मूलांक 8 -.आजचा दिवस चांगली बातमी आणू शकतो. तथापि, एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करणे आज त्रास देऊ शकते. भविष्याबद्दल जास्त काळजी केल्याने आरोग्य बिघडू शकते. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.
				  																	
									  
	 
	मूलांक 9 - आज मान-सन्मान वाढेल. मित्र किंवा कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. जुन्या गोष्टीबद्दल विचार करून अस्वस्थ होऊ शकता. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. धार्मिक कार्यात रस राहील.
				  																	
									  
	 
	अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.